कास- यवतेश्वर रस्त्यावर दोन चारचाकीचा समोरासमोर भीषण अपघात : तरूणी जागीच ठार

सातारा। कास- यवतेश्वर मार्गावर सिद्धटेक हॉटेल समोर दोन चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला असून यामध्ये एक तरूणी जागीच ठार झाली आहे. तर 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात दोन्ही गाड्याचे मोठे नुकसान झाले असून जखमींना साताऱ्यात उपचारासाठी हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघातातील जागीच ठार झालेल्या तरूणीचे वय अंदाजे 20 ते 22 वर्षे असल्याची माहिती मिळत आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कास- यवतेश्वर रस्त्यावर होंडा सिटी आणि क्रेटा या दोन गाड्या समोरासमोर जोरदार धडकल्या. यावेळी अपघातात दोन्ही गाड्यातील लोक जखमी झाले असून एक तरूणी ठार झाली. सदरील माहिती मिळताच शिवेंद्रसिंहराजे भोसले ट्रेकर्स घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी जखमींना बाहेर काढायचे काम चालू आहे. अपघातातील एका गाडीचा नंबर (MH- 11-BV- 5568) असा आहे. दोन्ही गाडीचालक हे सातारा शहरातील असल्याचे समजत आहे.
अपघाताच्या ठिकाणी दोन्ही चारचाकी गाड्यांची धडक झाल्यानंतर मोठा आवाज झाला. सिध्दटेक हाॅटेल येथील लोक घटनास्थळावर येवून जखमींना मदत करत सदरील घटना सातारा पोलिसांना कळवली आहे. अपघातातील जखमी हे सातारा शहरातील असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना शहरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सदरची घटना रात्री 9.30 ते 10 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.