Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यादेशपश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यविदेशसातारा

प्रदीप कुरुलकरवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद व्हावा : पृथ्वीराज चव्हाण यांची विधानसभेत मागणी

कराड । पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोप असणारे DRDO चे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या तपासाची चर्चा अधिवेशनात झाली. डॉ. प्रदीप कुरुलकरच्या प्रकरणाचा तपास एटीएसकडून एनआयएकडे सोपवण्याची मागणी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. तसेच गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्या प्रकरणी कुरुलकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशी आग्रही मागणी विधानसभेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

आ. पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, डॉ. प्रदीप कुरुलकरच्या प्रकरणाचा कोर्टात खटला सुरू आहे आणि यामधे फक्त एकच कलम लावण्यात आले आहे. हा व्यक्ती झारा नावाच्या एका महिला गुप्तहेरासोबत संपर्कात होता. आता माहिती समोर येतं आहे की हा व्यक्ती काही देश फिरला आहे. एका देशात दोघांनी एकत्र क्रिकेट मॅचदेखील पाहिली आहे. कुरुलकरांने देशविरोधी कृती केली. तरीही त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

केवळ ऑफिशिएल सिक्रेट ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीचा एका राजकीय पक्षाशी संबंधित एका संस्थेचा सदस्य आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत जयंत पाटलांनीदेखील याचा सखोल तपास करावा आणि कुरुलकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close