kota acadamy karad
कृषीताज्या बातम्यानोकरी संदर्भपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यशैक्षणिकसातारा

सातारा जिल्हा परिषदेत नोकरीची संधी : आजपासून 972 पदांसाठी अर्ज भरती सुरू

सातारा | सातारा जिल्हा परिषदेच्या (Satara Zilla Parishad) एकूण 21 संवर्गातील 972 पदांची भरती प्रक्रिया आज शनिवारपासून (दि. 5) सुरू होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार असून 25 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गासाठी भरती होणार आहे. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक एक, आरोग्य सेवक (पुरुष)- 76 जागा, आरोग्य सेवक (पुरुष) हंगामी फवारणी कर्मचारी- 170 जागा, आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)- 353, औषध निर्माण अधिकारी- 35, कंत्राटी ग्रामसेवक- 101, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ ग्रामीण पाणीपुरवठा)- 32. कनिष्ठ अभियंता (विद्युत)- 1, कनिष्ठ आरेखक- 2, कनिष्ठ लेखाधिकारी- 4. कनिष्ठ सहायक (प्रशासन)- 69, कनिष्ठ सहायक लेखा- 7, पर्यवेक्षिका- 3, पशुधन पर्यवेक्षक- 42. प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 4, वरिष्ठ सहायक – 2, वरिष्ठ सहायक (लेखा)- 10, विस्तार अधिकारी (कृषी)- 1, विस्तार अधिकारी (शिक्षण)- 2, विस्तार अधिकारी (सांख्यिकी)- 5, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक- 52 अशा रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क, ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्तींची माहिती जिल्हा परिषदेच्या www.zpsatara.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. भरतीसाठी पात्र उमेदवारांनी मुदतीत https://ibpsonline.ibps.in/ zpvpiun23/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत. खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना एक हजार रुपये तर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांना 900 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. यामध्ये माजी सैनिक व दिव्यांगांसाठी परीक्षा शुल्क माफ असणार आहे. उमेदवारांना अर्ज भरताना काही समस्या असल्यास या लिंकवर अथवा 1800222666, 18001034566 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. जिल्हास्तरावर सरळसेवा भरतीसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून, उमेदवारांना अर्ज भरताना येणाऱ्या अडचणींबाबत 02162 – 295053 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. डुडी व श्री. खिलारी यांनी केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close