मुख्यमंत्र्यांचे हेलिकाॅप्टर अचानक साताऱ्यात उतरवले… कारण आले समोर व्हिडिओ पहा

सातारा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मूळगावी दरे येथे हेलिकॉप्टरने निघाले होते, परंतु अचानक हेलिकॉप्टर साताऱ्यात उतरावे लागले. त्यामुळे साताऱ्यातून मुख्यमंत्र्यांना दरे गावी कारने जावे लागले. यावेळी त्याच्या स्वागताला शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. मुख्यमंत्र्यांचे हेलिकाॅप्टर साताऱ्यात उतरल्याचे नेमके कारण समोर आले असून खराब हवामानामुळे सैनिक स्कूल ग्राउंडवर हेलिकाॅप्टर उतरवल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज दरे गावी दाैरा नियोजित करण्यात आला होता. दरे येथे हेलिकाॅप्टर उतविण्यासाठी हेलिपॅडही आहे. अशावेळी साताऱ्यात मुख्यमंत्री उतरल्याने नक्की कारण काय, याबाबत विचारणा होत होती. परंतु, महाबळेश्वर, तापोळासह दरे गावात हवामान खराब असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टर त्यांचा मूळ दरे गावात उतरू शकले नाही.
आज सकाळी हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे मुंबईला परत गेले होते. मात्र त्यानंतर मुंबईतून साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या ग्राऊंडवर हेलिकाॅप्टर उतरविण्यात आले. यावेळी सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई, वाईचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह शिवसैनिक इतर पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पगुच्छ देवून मुख्यमंत्र्याचे स्वागत केले.



