क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

कोरेगाव तालुक्यातील प्रकार : सासूच्या अंत्यविधीसाठी आलेल्या सूनेचे साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

कोरेगाव | कवडेवाडी-भाडळे (ता. कोरेगाव) येथे सासूच्या अंत्यविधीसाठी आलेल्या सूनेचे रिक्षाच्या पुढील सीटमधून 3 लाख 60 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. याबाबतची तक्रार सून मनीषा उदय जगदाळे (सध्या रा. सैदापूर, ता. सातारा) यांनी वाठार पोलिसात दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आईच्या मृत्यूची बातमी मिळताच सातारा येथे राहणारा मुलगा व सून अंत्यविधीसाठी रिक्षाने कवडेवडी (ता. कोरेगाव) येथे आले. होते. आल्यानंतर रिक्षा राहत्या घरासमोरच असलेल्या रस्त्यालगत पार्किंग केली होती. नातेवाईक अंत्यविधीसाठी येईपर्यंत उशीर झाला. त्यामुळे अंत्यविधीला गुरुवारी रात्रीचे दीड ते पावणेदोन वाजले. अंत्यविधी उरकल्यानंतर सर्व नातेवाईक घरी आले. सून मनीषा यांनी रिक्षाच्या शीटखाली पेटीमध्ये पर्समधील पाकीट आणण्यासाठी गेल्या असता त्या ठिकाणी पसं नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. पर्समधील पाकिटामध्ये असणारे तीन लाख 60 हजार रुपयांचे सात तोळे व दोन ग्रॅम सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरून नेल्याचे लक्षात आले.

पर्समधील पाकिटामध्ये 1 लाख 25 हजार रुपयांचे सोन्याचे अडीच तोळे वजनाचे गंठण, 25 हजार रुपयांची सोन्याची ठुशी, 50 हजार रुपयांचे कानातील सोन्याचे तीन जोड्या टॉप्स, 25 हजार रुपयांचे कानातील सोन्याचे झुमके, 25 हजार रुपयांचे कानातील सोन्याचे वेल, 50 हजार रुपयांच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, 25 हजार रुपयांचे सोन्याचे पॅडल, 25 हजार रुपयांचे सोन्याच्या दोन जोड रिंगा, 10 हजर रुपयांची सोन्याची खड्याची नथ असा एकूण 3 लाख 60 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास झाला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार उदय जाधव करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close