क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

भाजी मंडईत सतुराचा धाक दाखवत खंडणी मागणारा कराड पोलिसांच्या ताब्यात

कराड | येथील भाजी मंडईत केळी विक्रेत्यास एकाने सतुराचा धाक दाखवत पैशाची मागणी केली. यावेळी पैसे देण्यास नकार दिल्याने संबंधिताने केळी विक्रेत्याचे साहित्य विस्कटून टाकत नुकसानही केले. यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत संशयताला ताब्यात घेतले.

याबाबत पोलिस ठाण्यात आलेल्या युवकांनी सांगितलेली माहिती अशी की, झोपडपट्टी परिसरातील एका व्यक्तीची बायपास सर्जरी झाली असून तो व्यक्ती केळी विक्रीचा व्यवसाय करतो. मात्र मागील काही दिवसांपासून एका संशयित सातत्याने येऊन त्या केळी विक्रेत्याकडे पैशाची मागणी करत होता. आपली परिस्थिती हालाखीची असून आपण हप्ता देऊ शकत नाही असे संबंधित विक्रेत्याने संशयिताला सांगितले होते. त्यानंतरही पैशाची मागणी सुरू ठेवल्याने त्या विक्रेत्यांशी संबंधित काही युवक व लोकांनीही संशयिताला वस्तुस्थितीची जाणीव करून दिली होती. त्यावेळी आपण पुन्हा पैशाची मागणी करणार नाही, असे संशयिताने आम्हाला सांगितले होते असे पोलिस ठाण्यात आलेल्या लोकांनी सांगितले.

गुरूवारी सायंकाळी पुन्हा तो संशयित हातात सतुर घेऊन आला आणि त्याने थेट हप्ता देण्याची मागणी केली. हप्ता न दिल्याने चिडलेल्या युवकाने त्याचवेळी विक्रीसाठी ठेवलेली केळी व अन्य साहित्य विस्कटून टाकले. हा प्रकार पाहताच परिसरातील युवकांसह महिलांनी घटनास्थळी धाव घेत संशयितास पकडले. या कालावधीत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी संबंधित संशयिताला ताब्यात घेत रात्री आठच्या सुमारास पोलिस ठाण्यात आणले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close