कृषीक्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

शेतकऱ्यांची शक्कल अंगलट : मक्याच्या शेतात आढळला 3 लाखाचा अफू

फलटण | मुळीकवाडी (ता. फलटण) येथे अफूची शेती करणार्‍यावर पोलिसांनी कारवाई करत तीन लाखांचा अफू जप्त केला. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्सटेबल वैभव सावंत यांनी दिली असुन सुरेश पवार याच्यावर लोणंद पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मुळिकवाडी गावाचे हद्दीत बाचकी नावाचे शेतात सुरेश शिवराम पवार याने त्याचे मालकीच्या शेतात अंमली पदार्थ अफुची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी शेतात छापा मारला. या छाप्यात एकुण 2737 झाडांची लागवड केल्याचे आढळून आले. यामधील काही झाडांची बोंडे तोडून ती मक्याच्या पिकामध्ये लपवून ठेवली असल्याचे आढळून आले.

सुरेश पवार यांच्या शेतातील अंमली पदार्थ अफुचा एकुण 2 लाख 77 हजार 200 रूपयांचा माल मिळून आला. या कारवाईमुळे फलटण तालुक्यात शेतकऱ्याच्यांत मोठी चर्चा सुरू आहे. पुढील तपास महिला पीएसआय एस. एन. पवार करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close