kota acadamy karad
Uncategorized

चोरी CCTV कॅमेऱ्यात कैद : कराडात पोलिस असल्याचे भासवून वृध्देला लुटले

कराड । पोलीस असल्याचे भासवून वृद्धेकडील दोन तोळ्याची सोन्याची माळ हातचलाखीने लंपास करण्यात आली. येथील पालिका शाळा क्रमांक तीनसमोर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर ही घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलिसात अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्मला मोहन पवार (रा. शुक्रवार पेठ, कराड) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शुक्रवार पेठेत राहणाऱ्या निर्मला पवार या रविवारी सकाळी नवकला चौकात भाजीपाला खरेदीसाठी गेल्या होत्या. भाजीपाला घेतल्यानंतर त्या पायी चालत घराकडे निघाल्या होत्या. त्यावेळी पालिका शाळा क्रमांक तीनसमोर दोघेजण उभे होते. त्यांनी निर्मला पवार यांना थांबवले. आम्ही साध्या वेशातील पोलीस आहोत. तुम्ही गळ्यात दागिने घालून फिरु नका. दागिने चोरीला जातील, असे त्या दोघांनी निर्मला पवार यांना सांगीतले. तसेच गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची माळ काढून आमच्याकडे द्या, आम्ही तुम्हाला ती पुडीत बांधून देतो, असे सांगीतले.

निर्मला पवार यांनी त्या दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन गळ्यातील माळ काढून त्यांच्या हातात दिली. त्यानंतर त्या दोघांनी कागदाच्या पुडीत माळ बांधून देण्याचा बहाणा करीत ती पुडी भाजीपाल्याच्या पिशवीत टाकली. त्यानंतर ते दोघेही दुचाकीवरुन तेथून निघून गेले. मात्र, संशय आल्यामुळे निर्मला पवार यांनी पुडी उघडून पाहिले असता त्यामध्ये सोन्याच्या माळेऐवजी लहान खडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलिसात दिली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close