Shekar Patil Maqheshwari Infra 1
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

खंबाटकी बोगद्यात लाईटचा अँगल तुटुन चालत्या ट्रकमध्ये घुसला : वाहतूक खोळंबली

खंडाळा | सातारा -पुणे जाणाऱ्या महामार्गावरील खंबाटकी घाटात पुण्याकडे जाणाऱ्या बोगद्यामधील लाईटचा असणारा अँगल तुटून ट्रकमध्ये घुसल्याची घटना घडली. या घटनेत चालक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र, ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुण्याच्या दिशेला जाणारा ट्रकमध्ये (क्रमांक- KA-44A-0525) खंबाटकी घाटात बोगद्यामधील लाईटचा अँगल अचानक तुटला. तुटलेला अँगल चालत्या ट्रकमध्ये घुसला. महामार्गावर चालत असलेल्या ट्रकमध्ये अँगल घुसल्यामुळे चालक किरकोळ जखमी झाला आहे. परंतु, ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रकच्या चालकांच्या बाजूलाच अँगल पडल्याने सुदैवाने चालक बचावला आहे. तर ट्रकच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

या ठिकाणी झालेल्या अपघाताने घाटात मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. महामार्गावर पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक बंद करून ही वाहातुक सकाळी 7.30 वाजल्यापासुन वाहतूक खंबाटकी घाटाने पुर्वीचा मार्गाने पुणे बाजुकडे वळवली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close