Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

कराड पंचायत समिती शेजारील कार्यालय फोडणाऱ्या तीन चोरट्यांना अटक

कराड | शहरातील पंचायत समितीजवळ असलेले एका प्रसिध्दी माध्यमाचे कार्यालय फोडणाऱ्या पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन अटक केले. कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. पगला शेखर काळे (वय- 24, रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा), जीन पक्ष्या काळे (वय- 30, रा. भवानीनगर, ताकारी, ता. वाळवा), पवन बिरजा पवार (वय- 25, रा. साखुरडे, ता वाळवा) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पंचायत समितीनजीक असलेले एक प्रसिद्ध माध्यमाचे कार्यालय गत महिन्यात चोरट्यांनी फोडले होते. चोरट्यांनी कार्यालयातील साहित्याची मोडतोड करुन रोकड तसेच साहित्य चोरुन नेले होते. पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रद्रीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सातारची गुन्हे शाखा तसेच कराडच्या गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास सुरू होता.

दरम्यान पोलिसांना आरोपींबाबतची माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक पंतग पाटील, उपनिरीक्षक राजू डांगे यांच्या पथकाने छापा टाकून तीन आरोपींना ताब्यात घेतले. याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close