शिवस्नेह निधीकडून ठेवीवर 1 टक्के जादा व्याजदर : अधिक माहिती वाचा
कराड | शिवस्नेह निधी बॅंक लिमिटेड गणेशोत्सवा निमित्ताने 15 आॅक्टोबरपर्यंत ठेवीवर 1 टक्के जादा व्याजदर दिला जाणार असून ठेवीदार, सभासद यांना 14 टक्के व्याज मिळणार असल्याने त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या चेअरमन स्नेहल अजित पवार यांनी केले आहे.
शिवस्नेह निधी संस्थेच्या साकुर्डी पेठ, मल्हारपेठ, तळमावले, भेदा चाैक (कराड), उंब्रज, ठाणे (कळवा), काैपरखैणे, नवी मुंबई या शाखेत सदरची 1 टक्के जादा व्याजदर योजना सुरू आहे. सदरील व्याजदर योजनेत जेष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जादा व्याज दिले जाणार असल्याने 14.50 टक्के ठेवीवर व्याज मिळणार आहे. गणेशोत्सव ते 15 आॅक्टोबर दरम्यान ही योजना लागू राहणार असल्याचे सांगितले आहे.
दामदुप्पट 5 वर्ष 3 महिन्यात
गणपती फेस्टिवल निमित्त ठेव पंधरवडा आयोजित करण्यात आला असून सर्व ठेवीवर, ठेवीदार आणि कर्जदार यांना शिवस्नेह विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच ठेवीची दामदुप्पट ही 5 वर्ष 3 महिन्यात मिळणार असल्याचे चेअरमन स्नेहल पवार यांनी सांगितले आहे.