क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

जखिणवाडीतील मारामारी प्रकरणी 6 जणांवर गुन्हा

कराड | जखिणवाडी- कणसे मळा (ता. कराड) येथील मारामारी प्रकरणी सहा जणांविरोधात कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज पाटील, प्रथमेश पाटील, अमर पाटील, जय पाटील, प्रदीप पाटील व एक अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद स्वप्नील प्रकाश कणसे (वय- 39 रा. कणसेमळा- जखिणवाडी) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी यांनी आपसात संगणमत करून बेकायदा जमाव करून पंकज पाटील याने फिर्यादी स्वप्नील कणसे यांना हाताने व काठीणे मारहाण करून जखमी केले. प्रतिक चव्हाण यास अमर पाटील याने दगडाने डोक्यात मारून जखमी केले. दरम्यान, भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या एकाला प्रथमेश पाटील याच्या हातातील चाकू लागून त्या जखमी झाल्या. तर फिर्यादीच्या आईस पंकज पाटील याने ढकलून दिल्याने त्या जखमी झाल्या.

या शिवाय संशयित आरोपी यांनी फिर्यादी स्वप्नील कणसे व साक्षीदार यांना लाथाबुक्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय संशयितांनी फिर्यादीच्या भाच्याचा मित्र सौरभ राजाराम धुमाळ याच्या घरी जाऊन त्याला व त्याच्या मामीला हाताने मारहाण केली. अधिक तपास पालिस हवालदार मुळे करत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker