ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रसामाजिक

साकुर्डीत बाल हनुमान मंडळाच्यावतीने सर्व रोग निदान शिबीर

कराड | साकुर्डी (ता. कराड) येथील बाल हनुमान मंडळाच्यावतीने आणि शिवतीर्थ फार्मा एजन्सी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सुपने यांचे विशेष सहकार्याने सर्व रोग निदान शिबिर पार पडले. यामध्ये धनुर्वात निर्मूलन करिता इंजेक्शन, जंत निर्मूलन गोळ्या, कॅल्शियमच्या गोळ्या वाटप, ब्लड प्रेशर व ब्लड शुगर मोफत तपासणी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. विश्वासराव निकम होते. तर शिबिराचे उद्घाटन हभप वसंत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यासिन मुलाणी, निवास शिंदे, बबन जाधव, मसुनाथ रसाळ, हणमंत डोंगरे, विशाल डोंगरे, अध्यक्ष अशोक डोंगरे, दादासो उंदाडे, रमेश पाटील, राहुल पाटील, उपसरपंच सुहास जाधव, शशिकांत मदने, पोलीस पाटील अरुण काळूगडे, म्होप्रे उपकेंद्रांच्या डाॅ. प्राजक्ता वठारे,आशा उलके आदी उपस्थित होते.

या शिबिरास डॉ. प्राजक्ता वठारे, डॉ. सचिन पाटील, डॉ. पांडुरंग निकम, डॉ. दत्तात्रय निकम, डॉ. योगेश पाटील, डॉ. निलेश कदम यांनी शिबिरार्थींची तपासणी केली. बाल हनुमान मंडळाला राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत पारितोषिक मिळाले असून गणराया ॲवॉर्ड मिळवला आहे. सूत्रसंचालन व प्रास्ताविक ॲड. विकास निकम यांनी केले तर आभार माजी सरपंच बबन जाधव यांनी मानले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close