kota acadamy karad
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

कराड उत्तरेत भाजपाकडून 15 कोटींची विकासकामे : रामकृष्ण वेताळ

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
कराड उत्तर मधील विविध विकास कामांसाठी सुमारे 15 कोटींचा विकासनिधी मंत्री गिरीश महाजन यांच्यामार्फत मंजूर झाला आहे. या कामाचे श्रेय इतरांनी घेऊ नये. भाजप नेत्यांमुळेच हा निधी उपलब्ध झाला असल्याने या कामांची भूमिपूजने करण्याचा हक्क ही फक्त भाजप नेत्यांनाच आहे, असा टोला रामकृष्ण वेताळ यांनी लगावला आहे. कराड उत्तर मधील विविध विकास कामाची भूमिपूजने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुढील आठवड्यात होणार आहेत, अशी माहिती यावेळी श्री. वेताळ यांनी दिली.

कराड उत्तर मतदार संघातील सुर्ली ते कामथी ते पाचुंद रस्ता, गजानन हाउसिंग सोसायटी गणपती मंदिर ते विरवडे, करवडी रस्ता, शिवडे ते भवानवाडी रस्ता, मरळी ते भगतवाडी रस्ता या रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी 15 कोटी पेक्षा जास्त निधी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मंजूर झालेला आहे. हा निधी मंजूर करण्यासाठी कराड उत्तर भाजपाच्यावतीने आम्ही गिरीश महाजन यांना निवेदन दिले होते. अनेक गावांना स्वातंत्र्यानंतर 75 वर्षातही रस्ता झालेला नाही. याबाबतची सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर कथन केली होती. आम्ही केलेल्या पाठपुरावामुळेच या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाला असल्याने याचे भूमिपूजन करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे, असे भाजप नेते रामकृष्ण वेताळ यांनी सांगितले.

स्वतः केलेल्या कामाचे श्रेय घ्यावे
कराड उत्तरेतील अनेक विकास कामांसाठी भाजप कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे माजी जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजप नेते मनोज घोरपडे यांच्या सहकार्याने हा निधी प्राप्त झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे निधी उपलब्ध करण्यासाठी विशेष सहकार्य लाभले. मात्र काही लोक आम्हीच केले, असे भासवून भूमिपूजनाचे नारळ फोडत आहेत. अशा लोकांनी स्वतः केलेल्या कामाचे श्रेय घ्यावे असे भा. ज.पा. किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close