Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगराज्यसातारा

डोक्यात धारधार शस्त्राने वार करून खून : सातारा एसपी समीर शेख घटनास्थळी

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
मलवडी (ता. फलटण) गावाच्या हद्दीमध्ये आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून झाल्याची घटना उघड झाली आहे. मलवडी गावातील अनिल महादेव चव्हाण (वय- 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मलवडी गावातीलच अनिल चव्हाण  यांचा आज सकाळी 6 वाजण्याच्यापूर्वी मलवडी गावाच्या हद्दीत अज्ञाताने धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी फलटण ग्रामीण विभागाचे पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. फलटण पोलिसांकडून अनिल चव्हाण व्यक्तीचा खून कशासाठी आणि कोणी केला यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

खून झालेल्या अनिल चव्हाण यांचे मूळ गाव वाल्हे (ता. पुरंदर, जि. पुणे) हे आहे. गेल्या चार वर्षापासून अनिल आपल्या मामाकडे रहायला होता. मलवडीत मोलमजुरी करणाऱ्या अनिलचा खून एका शेतात माळरानावर डोक्यात धारधार शस्त्राने वार करून करण्यात आला. घटनास्थळी पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close