काँग्रेसच्या नेत्यांना साताऱ्यात फिरू न देण्याचा भाजपाचा इशारा
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणे, त्यांच्याबद्दल अपशब्द बोलणे, स्वातंत्र्यवीरांचा अनुल्लेख करणे,स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या सहभागाबद्दल शंका उत्पन्न करणे आणि याबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनात गैरसमज पसरण्याचा प्रयत्न करणे हे एकच काम काँग्रेसकडे शिल्लक आहे. त्यासाठी काँग्रेस पार्टी वारंवार प्रयत्न करत आहे. कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी काँग्रेसच्या धोरणाप्रमाणे सावरकरांचा अपमान करून स्वातंत्र्यवीरांचा देशाचा अपमान केला आहे. या घटनेचा आता राज्यभरातून निषेध केला जात असून साताऱ्यातही निषेध करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी सातारा कडून साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पोवई नाक्यावर या घटनेचा निषेध करण्यात आला. काँग्रेसच्या नेत्यांनी असले धंदे बंद करावेत अन्यथा त्यांना साताऱ्यात पाय ठेवून देणार नाही, असा इशारा भाजपाचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष सचिन साळुंखे, मनीष महाडवाले, जिल्हा चिटणीस सुहास राजेशीर्के, चित्रपट आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, नगरसेविका आशाताई पंडित, माजी नगरसेवक किशोर पंडित,प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, प्रशांत जोशी, चंदन घोडके, रवी आपटे, रोहिणीताई शिरसागर प्रियाताई माने, अनिताताई बोडस, निशाताई जाधव, अमोल कांबळे अमोल टंकसाळे,चैतन्य बोडस, अमित काळे, राजेश माजगावकर, पोपट महाडिक, चंद्रकांत माने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते