kota acadamy karad
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यसातारा

सुपने – तांबवे गावांना सोडून जिल्हा परिषदेची उमेदवारी द्या

भाजपा पदाधिकाऱ्यांची अतुल बाबांकडे मागणी

कराड :- सुपने- तांबवे जिल्हा परिषद गटातून परंपरागत मोठ्या गावांना सोडून छोट्या व वंचित राहिलेल्या गावांना जिल्हा परिषदेची उमेदवारी भारतीय जनता पक्षाने द्यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आजपर्यंत तांबवे आणि सुपने या दोन गावांनाच जिल्हा परिषदेचे संधी देण्यात आली आहे. तेव्हा यावेळी आजपर्यंत संधी न मिळालेल्या गावांचा विचार व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तांबवे सुपने जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाकडून तांबवे गावचे माजी सरपंच आबासाहेब पाटील यांना प्रमुख दावेदार मानले जात आहे. त्यासोबत माजी उपसरपंच धनंजय ऊर्फ रवी ताटे, युवा नेते शंकर पाटील, ऍड. विश्वासराव निकम, डेळेवाडीचे तात्यासो बाबर, माजी पंचायत समिती सदस्य विजय चव्हाण तसेच माजी आमदार आनंदराव पाटील यांचे सुपुत्र प्रताप पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

सुपने पंचायत समिती गणासाठी भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत, युवा नेतृत्व असलेले गणेश पाटील यांच्या पत्नी सुप्रिया पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब मानले जात आहे. तर तांबवे पंचायत समिती गणातून उत्तम राऊत, माजी सरपंच संतोष कुंभार, मौजे साकुर्डीचे सुहास जाधव, साकुर्डी विकास सेवा सोसायटीचे तानाजी देवकर यांच्या नावाची चर्चा आहे.

सुपने गणातून निष्ठावंताला संधी मिळणार का..?
तुषार उर्फ गणेश पाटील गेली 15 वर्षे भाजप पक्षाचे एकनिष्ठ म्हणून काम करतायत. 2017 ला भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी तांबवे जिल्हा परिषद निवडणूक लढवून आपली नेतृत्वक्षमता दाखवून दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे एकही कार्यकर्ता नव्हता त्यावेळी पासून गणेश पाटील यांची निष्ठावंत म्हणून ओळख आहे. सत्ता नसतानाही पक्ष वाढीसाठी काम करणाऱ्या गणेश पाटील यांच्या पत्नी सुप्रिया गणेश पाटील यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

लहान गावांवरील अन्याय दूर व्हावा
जिल्हा परिषद, कारखाना, बँका यासह महत्त्वाच्या निवडणुका आल्या की मोठ्या गावांना प्राधान्याने संधी दिली जाते. आज पर्यंतचा इतिहास छोट्या गावांना संधी न दिल्याचा आहे. तेव्हा हा इतिहास बदलून छोट्या गावांना संधी द्यावी व मोठ्या गावांनी साथ द्यावी, अशी आमची मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांच्याकडे करण्यात आली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close