सातारा सांगली विधान परिषदेसाठी लढत ठरली पण…

सातारा – सातारा सांगली विधान परिषदेसाठी लढत ठरली आहे. महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशी लढत होणार असली तरीपण उमेदवार ठरेंना. महायुतीतून भाजप तर महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार गट लढणार हे निश्चित झाले आहे. भाजपाचा सातारा कि सांगलीला संधी द्यायचे यांचा अद्याप घोळ मिटेना.
साताऱ्यातून भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, धैर्यशील कदम, मंत्री जयकुमार गोरेंचे भाऊ शेखर गोरे, विक्रम पावसकरांसह छ. उदयनराजे भोसले यांचे समर्थक सुनील काटकर, छ.शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले यांची नावे चर्चेत आहेत. सांगलीतून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि सम्राट महाडिक यांची नावे चर्चेत असली तरी सांगलीला संधी मिळाल्यास सम्राट महाडिक उमेदवार ठरतील.
भाजपाकडून सातारा की सांगली यासाठी स्थानिक नेत्यांची चढाअोढ सुरू आहे. महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे की माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नावाची चर्चा असली तरी तिसरा पर्याय शोधत असल्याची माहिती मिळत आहे.
सातारा- सांगली जिल्ह्यातील पक्षीय बलाबल
भाजप- 314, राष्ट्रवादी काॅंग्रेस- 205, शिवसेना- 111 = एकूण = 630
राष्ट्रवादी शरद पवार- 119, काॅंग्रेस- 73 आणि उबाठा -1 = एकूण = 193



