kota acadamy karad
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यशैक्षणिकसातारा

जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थींनी : कराड तालुक्यातील अनुष्का वाकुर्डेचे CA परीक्षेत यश

उंडाळे – कराड तालुक्यातील सवादे येथील अनुष्का आनंदा वाकुर्डे हिने चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून आपल्या कुटुंबासह परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सवादे येथे झाले तर माध्यमिक शिक्षण यशवंत हायस्कूल कराड येथे झाले. तिचे वडील संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर बनवडी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आई गृहिणी आहे. मराठी माध्यमात शिकून सुद्धा तिने हे यश संपादन केल्याने तिचे काैतुक होत आहे.

कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर अनुष्काने ही यशस्वी कामगिरी केली. CA ही देशातील सर्वात आव्हानात्मक व्यावसायिक परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षेत यश मिळवून अनुष्काने आपल्या ध्येयपूर्तीकडे एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. तिच्या या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षक आणि मित्रपरिवार यांनी तिचे अभिनंदन केले असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनुष्काच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

शिक्षण मंडळ बनवडीचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव खापे, उपाध्यक्ष किशोर पाटील, सचिव विनायक माळी, खजिनदार कांतीलाल पाटील सर्व संचालक मंडळ सदस्य व जागृती विद्यामंदिर बनवडीचे मुख्याध्यापक सुधाकर चव्हाण तसेच सवादे व बनवडी गावचे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close