kota acadamy karad
कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनब्रेकिंगराजकियराज्यसातारा

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते समितीच्या सहअध्यक्षपदी प्रमोद पाटील यांची वर्णी

कराड :- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गठित केलेल्या समितीच्या सह अध्यक्षपदी वारूंजी (ता. कराड) येथील प्रमोद पाटील यांची निवड करण्यात आल्याने भाजपचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कराड येथील शासकीय विश्रामगृहात या सत्कार कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य नरेंद्र पाटील, माणिकराव पाटील, भैरवनाथ पाणी पुरवठा संचालक सिध्देश्वर पाटील, हरिशचंद्र पाटील, ताहीर आगा, माजी सरपंच पै. प्रमोद पाटील, ग्रामपंचयात सदस्य प्रशांत पाटील, संतोष पाटील, प्रफुल्ल पाटील, दिपक पाटील, सुनिल पाटील, माजी चेअरमन प्रकाश पाटील, चंद्रकांत पाटील, हणमंत गुरव, महादेव नांगरे- पाटील, सागर पाटील, रमेश लवटे, माजी सरपंच अमित पाटील यांच्यासह वारूंजी जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार डाॅ. अतुल भोसले म्हणाले, शेती हा आपला मुख्य व्यवसाय असून शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या माध्यमातून मोठा फायदा होणार आहे. रस्त्यांचा कायमाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रमोद पाटील काम करतील असा मला विश्वास आहे. तसेच शासन आणि प्रशासन यांच्यात ताळमेळ घालून यापुढील काळात पाणंद रस्त्यांचा प्रश्न सोडवला जाईल.

प्रमोद पाटील म्हणाले, आमदार अतुल भोसले यांच्या माध्यमातून माझ्या सारख्या तरूणावर भारतीय जनता पक्षाने विश्वास दाखवला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबध्द असून पुढील काळात शेती तेथे पाणंद रस्ता ही संकल्पना कराड दक्षिणेत राबवली जाईल.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close