सातारा जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू… मग वाचा बातमी
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा


सातारा ः- सामाजिक न्याय विभागांतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी सातारा, कराड आणि पाटण येथील वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
पात्रता – इयत्ता ८ वी ते १० वी मधील विद्यार्थी
कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात शिकणारे विद्यार्थी
शासन मान्यता प्राप्त शाळा/महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असावा
पाटण तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य
उत्पन्न मर्यादा
OBC / VJNT प्रवर्ग : वार्षिक उत्पन्न ₹१ लाखापर्यंत
SC / ST प्रवर्ग : वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखापर्यंत
आवश्यक कागदपत्रे
१. मागील वर्षाच्या गुणपत्रिकेची प्रत ८ वी प्रवेशासाठी ७ वीची टक्केवारी मुख्याध्यापकांच्या सही व शिक्क्यासह
२. जातीचा दाखला (प्रांताधिकारी कार्यालयाचा)
३. उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार कार्यालयाचा)
४. आधार कार्ड व बँक पासबुकची प्रत
५. डोमिसाईल दाखला (तहसीलदार कार्यालयाचा)
६. शाळा सोडल्याचा दाखला
७. सध्याच्या शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र उपलब्ध सुविधा
मोफत निवास व भोजन व्यवस्था
शासन नियमानुसार गणवेश, स्टेशनरी व निर्वाह भत्ता थेट बँक खात्यावर
सुसज्ज ग्रंथालय व वाचनालय
अभ्यासिका व संगणक कक्ष
करमणूक कक्ष
खुली व बंदिस्त व्यायामशाळा
क्रीडा साहित्य
प्रशस्त इमारत व सुरक्षित परिसर
संपर्क फोन : ०२३७२-२८२३०७ / ७०५८९५७०३८
ऑनलाईन प्रवेश वेबसाईट
hmas.mahait.org अर्ज करता येतील.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जून २०२६ दिनांक २८ जून रोजी
सातारा- शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून २०२६ परीक्षेचे आयोजन रविवार दि. २८/०६/२०२६ रोजी करण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी बंगाली, कन्नड, तेलगु, गुजराथी, सिधी माध्यमांच्या विद्यार्थी/उमेदवारांची राज्यामध्ये एकूण संख्या कमी प्रमाणात असल्याने संबंधित सर्व विद्यार्थी/उमेदवारांचे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येत आहेत. याची संबंधित सर्व विद्यार्थी/उमेदवारांनी नोंद घ्यावी.



