ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारासामाजिक
अशोकराज पतसंस्थेकडून मयत कर्जदाराच्या वारसांना एक लाखांची आर्थिक मदत


पाटण :- कराड तालुक्यातील साकुर्डी पेठ येथील अशोकराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या नवारस्ता शाखेकडून पाटण तालुक्यातील मयत कर्जदार सभासदाच्या वारसांना आर्थिक मदतीचा हात देण्यात आला आहे.
पाटण तालुक्यातील सोनवडे येथील कर्जदार सभासद संदीप हनुमंत शेजवळ यांचे 7 मार्च 2025 रोजी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर संस्थेकडून सामाजिक बांधिलकी जपत वारसांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
संस्थेचे चेअरमन शरद जयसिंग चव्हाण यांच्या हस्ते ही मदत वारसांकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ सदस्य तसेच कर्मचारी उपस्थित होते. अशोकराज पतसंस्थेच्या या मदतीमुळे वारसांना दिलासा मिळाला असून संस्थेच्या या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत आहे.



