ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

विंगजवळ दुचाकीला बिबट्याची धडक; तासवडे एमआयडीसीतही दिसला

विंग :-  कराड-ढेबेवाडी मार्गावरील विंग-शिंदेवाडी दरम्यान शुक्रवारी रात्री दुचाकी आणि बीबट्या यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली. धडकेनंतर काही काळ रस्त्यावर पडून राहिलेला बीबट्या नंतर भिकारखडी डोंगराच्या दिशेने निघून गेला.

मिळालेल्या माहितीनुसार, एक दुचाकीस्वार कराडच्या दिशेने जात असताना विंग-शिंदेवाडी दरम्यान त्रिमूर्ती कार्यालयासमोर अचानक बीबट्या रस्त्यावर आला. त्यामुळे दुचाकी आणि बीबट्या यांच्यात जोरदार धडक झाली. धडकेमुळे दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेला, तर बीबट्यालाही गंभीर धक्का बसून तो काही काळ रस्त्यावर निश्चल पडून राहिला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी दुचाकीस्वाराला सुरक्षित ठिकाणी हलविले. दरम्यान, काही वेळाने बीबट्या उठून गर्दीच्या दिशेने धावल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र आरडाओरडा होताच त्याने जवळील डोंगराच्या दिशेने पलायन केले.

तासवडे एमआयडीसी, वडगावमध्येही बिबट्या
दुसरीकडे कराड तालुक्यातीलच तासवडे एमआयडीसीत पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळून आला असून बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गेल्या चार महिन्यांत एमआयडीसीत बिबट्या शिरण्याची ही तिसरी घटना असल्याने उद्योजक आणि कामगार वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर खटाव तालुक्यातही बिबट्याची दहशत पहायला मिळत आहे. जयराम स्वामींच्या वडगावमध्ये वडजाई मंदिर परिसरात दूध गाडी चालकाला रस्त्याकडेला बिबट्या दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close