क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमुंबईराज्यसातारा

घात की अपघात? : कराड शहरात अधिकाऱ्याला कार चालकाने उडवले, जागीच मृत्यू

कराड :- कराड तालुक्यातील मनव गावचे लक्ष्मण मंडले यांना आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका चारचाकीने उडवले असून त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. लक्ष्मण मंडले हे सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात मृदू व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शनिवार, रविवार साप्ताहिक सुट्टीला आपल्या कुटुंबाकडे येत असताना हा अपघात झाला आहे. मात्र हा अपघात की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात असून पोलिस कसून चाैकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मंडले यांची सहा महिन्यापूर्वी शहापूर येथे उपविभागीय अधिकारी (मृदू व जलसंधारण विभाग) म्हणून बदली झाली होती. त्याचे कुटुंबिय कार्वे नाका येथे सध्या वास्तव्यास असतात. त्यामुळे ते प्रत्येक शनिवार व रविवार सुट्टी येत असतात. आज पहाटे लक्ष्मण मंडले कोल्हापूर नाक्यावरून कार्वे नाका रोडला जाणाऱ्या रस्त्यावरून चालत निघाले होते. कराड शहरातील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल समोरून चालत असताना एका भरधाव चारचाकी कारने उडवले आहे. या घटनेनंतर घटनास्थळावरून चालक चारचाकी कारसह फरार झाला असून अधिकारी लक्ष्मण मंडले यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनास्थळावरून कार चालकाने पलायन केल्याने हा अपघात की घातपात असा संशय व्यक्त केला जात आहे. कराड शहर पोलिसांकडून घटनास्थळावरील पंचनामा केला असून काही संशयितांची कसून चौकशी सुरू केली आहे. यामध्ये काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close