kota acadamy karad
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

कोयना धरणाजवळ नदीत बुडून सख्या चुलत भावंडाचा अंत

पाटण :- कोयना धरणाच्या भिंतीपासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या कोयना नदीमध्ये पोहोण्यासाठी गेलेल्या दोघा चुलत भावंडाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि. ५ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. दोन्ही भावंडाचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले असून याची नोंद कोयनानगर पोलिसात झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी गाडखोप येथील सहा मित्र नदीला पोहण्यासाठी गेलेले होते. यातील चाैघांना पोहायला येत नसल्याने ते नदीकाठी बसलेले होते. तर दोन चुलत भावंडे नदीत पोहायला गेलेली होती. करण दाजी कदम (वय- 15) व आर्यन अनिल कदम (वय-16 ) अशी या बुडालेल्या भावंडाची नावे आहेत. या घटनेमुळे गाडखोप गावासह कोयना परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेची फिर्याद अनिल कदम यांनी दिली आहे. तर पोलिस हवालदार शशिकांत गुरव अधिक तपास करत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close