ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यशैक्षणिकसांगलीसातारा

सातारा जिल्ह्यात ब्रिलिएंट अकॅडमीचा रेकॉर्डब्रेक निकाल : JEE परीक्षेत 178 रॅंकसह आर्यन पाटील अव्वल

सातारा :- स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात सातत्याने यशाची परंपरा जपणाऱ्या ब्रिलिएंट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यंदाही जेईई अडवांस्ड या भारतातील अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यशाच्या परंपरेला पुढे नेत अकॅडमीच्या फाउंडेशन बॅचमधील विद्यार्थी आर्यन मोहन पाटील याने उत्कृष्ट कामगिरी करत ऑल इंडिया रँक १७८ मिळवला असून तो सातारा जिल्ह्यातील अव्वल विद्यार्थी ठरला आहे. फाउंडेशन बॅचमधून घडलेले हे यश संस्थेसाठी विशेष अभिमानाची बाब मानली जात आहे. सागरेश्वर रमेश थोरात याने JEE Advanced मध्ये ऑल इंडिया रँक ५३३ मिळवत आयआयटीमध्ये प्रवेश निश्चित केला आहे, तसेच सोहम प्रशांत फणसेकर ऑल इंडिया रँक ६३३७ मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

आर्यनने आपल्या सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर हे यश मिळवले. त्याच्या या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणास्थान ठरला आहे.आर्यन मोहन पाटील हा विद्यार्थी ब्रिलियंट अकॅडमी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या कॉलेज च्या मुख्याध्यापिक रुपाली मोहन पाटील यांचा सुपुत्र आहे पुढील शिक्षणाची योग्य दिशा देण्यासाठी आर्यन चे जेईई चे फाउंडेशन ई ८ वी पासूनच सुरू करायचे हा निर्णय आदित्य सर, निलेश सर आणि अगरवाल सर, अभिषेक सर यांनी घेतला व तो योग्य ठरला आर्यन ने आपल्या येथील फाउंडेशन चे व जेईई चे अध्यापन किती दमदार आहे हे सिद्ध केले कारण आर्यन हा कराड मधील नामांकित पी एम श्री शाळा क्र ३ चा विद्यार्थी असून तेथील माजी मुख्याध्यापक कोळी सर, गाडवे सर, जाधव मॅडम यांचेकडून शिस्त, जिद्द, चिकाटी व प्रामाणिकपणा चे धडे त्याला मिळाले पुढे निलेश्वर माध्यमिक विद्यालय वडोली निळेश्वर या शाळेत मुख्याध्यापक सचिन नलवडे सर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले, माध्यमिक विद्यामंदिर सदाशिवगड च्या पाटील मॅडमच्या मोलाच्या मार्गदर्शातून तो १० वी उत्तीर्ण झाला त्याचबरोबर फाउंडेशन चे अध्ययन येथील शिक्षकांकडून सुरू होते.

सागरेश्वर थोरात हा सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल कडेपूर चा सूर्यवंशी मॅडम च्या मार्गदर्शातून १० वी पर्यंत शिकलेला विद्यार्थी ब्रिलियंट अकॅडमीचा विद्यार्थी माजी सैनिकाचा मुलगा असून, सागरेश्वरने आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर हे यश मिळवत संपूर्ण परिसराचे नाव उज्ज्वल केले. बोमबाळेवाडीसारख्या छोट्या गावातील आणि माजी सैनिकाचा मुलगा असलेल्या सागरेश्वरने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. तसेच सोहम प्रशांत फणसेकर यानेही आपल्या मेहनत, शिस्त आणि निष्ठेच्या जोरावर ऑल इंडिया रँक ६३३७ मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सोहम हा संस्थेतील मेहनती व अभ्यासू विद्यार्थी म्हणून ओळखला जातो.मेहनती, शिस्तप्रिय आणि संस्थेप्रती निष्ठावान विद्यार्थी म्हणून ओळख असलेल्या सोहमने आपल्या चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले. सोहम हा मूळचा मालवण चा, कोकणात त्याला फारसे मार्गदर्शन मिळाले नाही परंतु पालकांची जिद्द त्याला कराड येथे नामांकित ब्रिलियंट अकॅडमी मध्ये घेऊन आली व त्याच्या जीवनाचे सार्थक झाले.

ब्रिलिएंट अकॅडमीचे संचालक, शिक्षकवर्ग आणि पालकांनी या तिन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि सातत्य यांच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर यश मिळवता येते, हे सागरेश्वर थोरात, आर्यन पाटील आणि सोहम फणसेकर या खेडोपाड्यातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी स्वतः ला सिद्ध करून दाखवले आहे. विद्यार्थ्यांच्या या दैदीप्यमान यशाबद्दल त्यांची ब्रिलियंट कॉलेज ते विद्यानगर परिसरात भव्य रॅली काढण्यात आली होती.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close