
हॅलो न्यूज :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी 6 जागा महायुतीने जिंकल्या होत्या. त्यानंतर आता उर्वरित 11 जागांवरही महायुतीने बाजी मारत. महाविकास आघाडीला जोरदार झटका दिला असून शून्यावर महाविकास आघाडीचा बोल्ड काढला आहे. मात्र, सातारा जिल्हा परिषदेची पुनरावृत्ती नाशिकात पहायला मिळाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवार नरेंद्र दराडे यांचा भाजप बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी पराभव केला आहे.
सातारा सांगलीतून भाजपाचे धैर्यशील कदम विजयी
सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा विजय झाला आहे. धैर्यशील कदम यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा 301 मतांनी पराभव केला. भाजपाचे उमेदवार धैर्यशील कदम हे विजय झाल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर फटाक्यांची अतिषबाजी करत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सातारा- सांगली निवडणुकीत महायुतीची 40 मते फुटली.
भाजपचे राजेंद्र राऊत विजयी उंबरठ्यावर
– भाजपचे राजेंद्र राऊत सोलापूर विधान परिषद निवडणुकीत विजयी..
– राजेंद्र राऊत यांनी 365 मते घेऊन विजयी..
– 16 मते ठरवण्यात आली बाद..
– राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वसंत देशमुख यांना 118 मत मिळाली
धाराशिव जिल्ह्यातून भाजपाचे बसवराज पाटील यांचा विजय
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बंडाचा महविकास आघाडीला फटका
धाराशिव, बीड आणि लातूर विधानपरिषद निवडणूक मधील महविकास आघाडी ची 150 मते फुटली
महायुतीचे भाजपाचे उमेदवार बसवराज पाटील यांना 845 मते
721 मतांनी बसवराज पाटील विजयी
तर काँग्रेसच्या महेश देशमुखांना मिळाली केवळ 124
अमरावती भाजपचे प्रवीण पोटे पाटील यांचा तिसऱ्यांदा दणदणीत विजय
प्रवीण पोटे पाटील यांना 390 मतं तर वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांना मिळाले 31 मतं..
काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुख यांना शून्य मते.
छत्रपती संभाजी नगरमध्ये भाजपचे सुहास शिरसाठ विजयी
अपेक्षेप्रमाणे विधान परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीमध्ये भाजपचे सुहास शिरसाठ यांचा विजय झाला. त्यांना ४५५ मते मिळाली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश लोखंडे यांना १३५ मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार इसाक संदूक खान यांना ३५ मते मिळाली. तर पाच मते बाद ठरली.
भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत भाजपा विजय….
भंडारा गोंदिया जिल्ह्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपा उमेदवाचा विजय झाला आहे. भाजपा ३०२ तर अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांना १५४ मत मिळाली आहेत. यात एक मत अवैध ठरलं आहे. मात्र भाजपा महायुतीकडे एकूण ३१२ मत असताना १० मते फुटली आहे.
परभणी मतमोजणी अखेर सईद खान विजयी
242 मत – सईद खान यांना मत (शिवसेना)
159 मत – डॉ. विवेक नावानंदर (उबाठा)
56 मत – सुशिल देशमुख (अपक्ष)
8 – मत बाद
नागपूरमध्ये भाजपाचे डाॅ. राजीव पोतदार विजयी
काॅंग्रेसचे उमेदवार पराभूत
नांदेड विधान परिषद निवडणूकीत अमर राजुरकर विजयी
एकुण मत – 452
झालेले मतदान -.451
महायुतीचे उमेदवार अमर राजुरकर यांना 339
मविआ पुरस्कृत -. कृष्णा पाटील आष्टीकर – 84
वंचीतचे प्रशांत इंगोले – 05
बाद मते – 23
अमर राजूरकर 255 मतांनी विजयी
जळगावात महायुतीचा विजय
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन 577 हून अधिक मतांनी विजयी
महाविकास आघाडीचे शरद तायडे यांना 5 मत मिळाल्याची माहिती…



