कृष्णा कारखाना अंतिम निकाल : सहकार पॅनेलची हॅटट्रीक 21- 0

कराड :- रेठेरे येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक 2026 मध्ये सहकार पॅनेलने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला असून 21 -0 असा मोठा विजय मिळवला आहे. सहकार पॅनलचे प्रमुख व कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलने हॅटट्रीक केली आहे. तर संस्थापक पॅनेलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचा मोठ्या मतांनी पराभव झाला आहे.
सहकार व संस्थापक पॅनेलच्या उमेदवारांना मिळालेली मते व अंतिम निकाल पुढीलप्रमाणे
ऊस उत्पादक गट 1 सर्वसाधारण (वडगाव हवेली- दुशेरे) – सहकार पॅनेल विजयी उमेदवार धोंडीराम जाधव (दुशेरे) 24, 868, जगदीश जगताप (वडगाव हवेली) 23,768, आनंदा खबाले (विंग) 24,108, पराभूत उमेदवार संस्थापक पॅनेल- आनंदा जगताप 10, 208, प्रताप जगताप 10, 048, दुर्योधन खबाले 9, 437
सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्रमांक 2 (कार्वे-काले) – सहकार पॅनेल विजयी उमेदवार अरविंद पाटील (आटके) 24, 851, दयाराम पाटील (काले) 24,108, बाजीराव थोरात (कार्वे) 23,475, पराभूत उमेदवार संस्थापक पॅनेल- संतोष थोरात 10,022, प्रतापराव पाटील 10,363, शांताराम पाटील 9, 802
सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्रमांक 3 (तांबवे- नेर्ले) सहकार पॅनेल विजयी उमेदवार दत्तात्रय देसाई (वाठार) 24, 678, लिंबाजी पाटील (तांबवे) 24, 044, संभाजीराव पाटील (नेर्ले) 23, 963, पराभूत उमेदवार संस्थापक पॅनेल सुरेश पाटील 9944, सुभाष पाटील 10, 317, किरण पाटील 10, 089
सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्रमांक 4 (बोरगाव- रेठरे हरणाक्ष) विजयी उमेदवार जयवंत मोरे (रेठरे हरणाक्ष) 24, 639, सत्यजित पाटील (बोरगाव) 24, 040, सुनील पाटील (कामेरी) 23, 957, पराभूत उमेदवार संस्थापक पॅनेल जयकर शिंदे 9925, अशोक पाटील 10,116, उदयसिंह शिंदे 9, 819
सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्रमांक 5 (येडेमच्छिंद्र- वांगी) विजयी उमेदवार सहकार पॅनेल संग्राम पाटील (येडेमच्छिंद्र) 24,172, बाबासो शिंदे (देवराष्ट्रे) 22,9 53, पराभूत उमेदवार संस्थापक पॅनेल माणिकराव मोरे 10,194, सुरेश पाटील 10, 060
सर्वसाधारण ऊस उत्पादक घटक क्रमांक 6 (रेठरे बुद्रुक- शेणोली) विजयी उमेदवार सुरेश भोसले (रेठरे बुद्रुक) 24, 809, बाजीराव निकम (शेरे) 21, 925, पराभूत उमेदवार संस्थापक पॅनेल अविनाश मोहिते 11,456, दीपक कणसे 9, 677
महिला राखीव गट विजयी उमेदवार सहकार पॅनेल सुजाता जाधव (कपिल) 23, 479, सुनीता शेवाळे (सवादे) 21, 874 पराभूत उमेदवार संस्थापक पॅनेल अर्चना मोहिते 11, 896, विजया पाटील 10,217
अनुसूचित जाती जमाती राखीव गट विजयी उमेदवार छगन कांबळे (कोळे) 24, 658, पराभूत उमेदवार संस्थापक पॅनेल सुधीर रोकडे 10, 599. भटक्या विमुक्त जाती व जमाती सहकार पॅनेल विजयी उमेदवार अविनाश खरात (खरातवाडी) 24, 515 पराभूत उमेदवार संस्थापक पॅनेल दिलीप गलांडे 10, 561, इतर मागास प्रवर्ग राखीव गट बाळासाहेब जगताप (कोडोली) 25, 010 पराभूत उमेदवार संस्थापक पॅनेल प्रकाश श्रीखंडे 10, 276




