कराडला स्टार इंग्लिश, सरस्वती विद्यालय व्हाॅलीबाॅल विजेते, जिल्हा पातळीवर निवड
खेळात हार जीत होते खेळाडू ने खिलाडू वृत्ती जोपासली पाहिजे - जिल्हा क्रीडा अधिकारी प्रज्ञा वरेकर

कराड (हॅलो न्यूज) – खेळात हार जित होते, खेळाडूच्या अंगी खिलाडूवृत्ती व संयम असावा लागतो.असे प्रतिपादन सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी प्रज्ञा वरेकर यांनी केले. सदाशिवगड येथील यशवंत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या १७ वर्षे वयोगटातील शासकीय हाॅलीबाॅल स्पर्धा बक्षीस वितरण समारंभावेळी त्या बोलत होत्या. या स्पर्धेतील मुले गटातून स्टार इंग्लिश मेडियम स्कूल तर मुलींच्यातून सरस्वती विद्यालय कराड विजेते झाले असून त्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.
यावेळी संस्था सचिव डी. ए. पाटील, बनवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरराव खापे, जागृती शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल माळी, उपाध्यक्ष किशोर पाटील, संचालक राजेंद्र काटवटे, मुख्याध्यापिका मनिषा पानवळ, विजया कदम, सुधाकर चव्हाण, क्रिडा शिक्षक अंजली पाटील, समर्थ बनसोडे, सुरेश वेताळ, निवास पोळ, अनिल पाटील, दिपक पाटील यांची उपस्थिती होती.

क्रीडा अधिकारी प्रज्ञा वरेकर म्हणाल्या, हाॅलीबाॅल या खेळाच्या जोरावरवरच मी शासकीय सेवेत रुजू झाले आहे. खेळातून आपली आवड पुर्ण करु शकता. आपले कौशल्य खेळातून दाखवा.
यावेळी सचिव डी. ए. पाटील म्हणाले. यशवंत शिक्षण संस्था सदाशिवगडचे माध्यमिक शाळेत हाॅलीबाॅल या शासकीय क्रिडा स्पर्धा आयोजन चांगल्या प्रकारे केले आहे. आपल्या अंगी जिद्द, चिकाटी व खिलाडू वृत्ती असेल तर खेळात यश संपादन केले जाते. यावेळी शंकरराव खापे यांनी मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश वेताळ यांनी केले. आभार मनिषा पानवळ यांनी मानले.
जिल्हा पातळीवर निवड
क्रिडा व युवक संचालन महाराष्ट्र राज्य व सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने 14 वर्षा खालील व 17वर्षा खालील तालुकास्तरीय शासकीय हाॅलीबाॅल स्पर्धाचे आयोजन यशवंत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते. यामध्ये मुलीचे 13 संघ व मुलांचे 24 संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये मुलींच्या 17 वर्षीय मोठ्या गटात स्टार इंग्लिश मेडियम स्कूल हा विजेता तर विठामाता विद्यालय कराड हा उपविजेता संघ ठरला. मुलांच्या गटात सरस्वती विद्यालय कराड संघ विजेता तर जागृती विद्यालय बनवडी हा उपविजेता संघ ठरला. विजेता संघांची जिल्हा पातळीवर स्पर्धासाठी निवड झाली आहे.



