कराड सोलर ऊर्जा
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारासामाजिक

डाकेवाडीत स्व. राजाराम डाकवे (तात्या) राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

शिवसमर्थ मल्टीपर्पज पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन बोत्रे यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान

ढेबेवाडी (हॅलो न्यूज) :- स्व. राजाराम डाकवे (तात्या) यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा डाकेवाडी- काळगाव (ता. पाटण) येथे उत्साहात पार पडला. डॉ. संदीप डाकवे यांच्या निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमात स्व. राजाराम डाकवे यांच्या आठवणींना उपस्थित मान्यवरांनी उजाळा दिला.

यावेळी महंत अहिल्यागिरीजी महाराज, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संभाजीराव पाटणकर, वक्ते व लेखक प्रदीप कांबळे, डॉ. राजेंद्र कंटक, न्यूज १८ मराठीचे विशाल पाटील, उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख, सानिका माने आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात शिवसमर्थ मल्टीपर्पज पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन बोत्रे यांना यंदाचा स्व. राजाराम डाकवे (तात्या) सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच न्यू इंग्लिश स्कूल, काळगाव येथील दहावीच्या परीक्षेत मुलींच्या विभागात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल कु. सिद्धी विकास काळे हिचा रोख एक हजार रुपये, सन्मानपत्र व ‘तात्या’ पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.
राज्यस्तरीय स्व. राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कारासाठी राज्यभरातील १७ साहित्यिक व त्यांच्या साहित्यकृतींची निवड करण्यात आली होती. या सर्व साहित्यिक लेखकांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ‘तात्या’ पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.

याशिवाय प्रथम वर्षाचा स्मृती सर्वोत्कृष्ट वाचनालय पुरस्कार सैदापूर येथील समाजभूषण बाबुराव गोखले सार्वजनिक ग्रंथालय व मालदन येथील युवा साहित्य समाज वाचनालयास प्रदान करण्यात आला. तात्याश्री दिवाळी अंक स्पर्धा तसेच ‘सेल्फी विथ गुढी’ स्पर्धेतील विजेत्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी डाकवे परिवाराने सात वर्षांपासून राबविलेल्या विविध उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले. भविष्यात वाचनालयाच्या माध्यमातून साहित्यिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम अधिक व्यापकपणे राबविण्यात येणार असल्याचे डॉ. संदीप डाकवे यांनी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close