ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रसातारासामाजिक

चोराडे येथे 18 लाख रूपयांच्या नवीन डीपीचा लोकार्पण सोहळा

युवा नेते विक्रमबाबा कदम यांची मूलभूत सुविधा पुरविण्याची ग्वाही

पुसेसावळी | पुसेसावळी जिल्हा परिषद गट अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या सर्व वाड्या वस्त्यांना पिण्याच्या- शेती पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट, आरोग्य, शिक्षण, रोजगाराच्या संधी आदी मूलभूत सुविधा पूरविणार असल्याची ग्वाही, पुसेसावळी जि. प. गटाचे युवा नेतृत्व वर्धन ऍग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम यांनी दिली. चोराडे (ता.खटाव) येथील नांगरे मळा व कुरणवस्ती येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने 18 लक्ष रुपये किमतीच्या बसविण्यात आलेल्या दोन नवीन डीपीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चोराडे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पिसाळ होते. भैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन धनश्री साळुंखे, व्हाईस चेअरमन सुलोचना पिसाळ, संचालक उमेश पिसाळ, नंदकुमार पिसाळ, माजी चेअरमन हणमंत पिसाळ, गोविंदशेठ पिसाळ, माजी सोसायटी संचालक विलास पिसाळ नांगरे, भाऊसो पिसाळ, बाळासो पिसाळ आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीकांत पिसाळ म्हणाले, आ. जयकुमार गोरे, भाजपा नेते धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेतृत्व विक्रमबाबा कदम यांनी सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे जे पर्व पुसेसावळी जि. प. गटात निर्माण केले आहे. त्यामुळे या विभागातील जनता भविष्यात निश्चितच त्यांना पाठबळ देईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

यावेळी सुनील पिसाळ, चंद्रकांत पिसाळ, चंद्रकांत अवघडे, नवनाथ पिसाळ, रवींद्र पिसाळ, संतोष माळी, अशोक पिसाळ, शामराव पिसाळ, भीमराव मोरे, बजरंग पिसाळ, श्रीकांत पिसाळ, अशोक पाटील, अनिल पिसाळ, प्रशांत पिसाळ, रामभाऊ पिसाळ, दत्तात्रय पिसाळ, दत्तात्रय निकम, रघुनाथ पिसाळ, संतोष माळी, नाथा पवार, मंगेश पिसाळ, महेश पिसाळ, अण्णा साळुंखे, सुभाष पिसाळ, शुभम पिसाळ, सागर पिसाळ, रामचंद्र पिसाळ, भगवान पिसाळ यांचेसह गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close