kota acadamy karad
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनराज्यसातारा

कराड शहरात विक्रीस आणलेला एक किलो गांजा जप्त

कराड | कराड शहरातील कृष्णा नाका येथे गांजाची विक्री करण्यास आलेल्या एका सराईत गुन्हेगारास शहर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषन विभागाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. या संशियतांकडून 60 हजार रूपयांचा एक किलो गांजा व एक दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गणेश संजय वायदंडे (रा. बुधवार पेठ, कराड) असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस उप निरीक्षक आर. एल. डांगे यांना त्यांचे खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की, कृष्णा सर्कल परिसरातून एकजण पांढऱ्या रंगाचे अॅक्टिव्हा गाडीतून गांजाची तस्करी करणार आहे. त्या माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उप निरीक्षक डांगे व डी. बी. टीम यांनी तात्काळ सापळा रचुन गणेश वायदंडे याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडुन एकुण 60,00/- मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित आरोपी गणेश वायदंडे हा एक सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर कराड शहर पोलीस ठाणेस अनेक गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, कराड शहर पोलीस ठाणे पोलीस उप निरीक्षक आर. एल. डांगे, प्रविण जाधव, सफौ. आर. देसाई, देवकुळे, पोलीस हवालदार शशि काळे, नाईक संतोष पाडळे, कुलदीप कोळी, पोलीस शिपाई महेश शिंदे, आनंदा जाधव, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, रईस सय्यद, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close