Shekar Patil Maqheshwari Infra 1
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यशैक्षणिकसातारा

वसंतगडच्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीत यश

कराड – वसंतगड (ता. कराड) येथील श्री चंद्रसेन शिक्षण संस्थेच्या श्री वि. ग.माने हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त केली.

कु. वेदिका नवनाथ सूर्यवंशी हिने गुणवत्ता यादीत कराड तालुक्यात 7 वा क्रमांक व सातारा जिल्ह्यात 55 वा क्रमांक तर कु.प्रांजल निलेश चव्हाण हिने कराड तालुक्याच्या गुणवत्ता यादीत 214 वा क्रमांक मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त केली. तसेच निल सचिन जाधव इयत्त्ता 8 वी याची सैनिक स्कुल, सातारा येथे निवड तसेच त्याला इ. 8 वी स्कॉलरशिप परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त झाली.

त्यांच्या या यशाबद्दल श्री. चंद्रसेन शिक्षण संस्थेचे सचिव रघुनाथ नलवडे (दादा), उपाध्यक्ष महिपती कोकरे, हणमंतराव नलवडे, चंद्रकांत पाटील, सरपंच अमित नलवडे, तानाजीराव वाघमारे, मुख्याध्यापक मंदार दीक्षित, पर्यवेक्षक शिवाजी पाटील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक इत्यादींनी अभिनंदन केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close