ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनराज्यशैक्षणिकसातारा

साकुर्डी गावकरी भारी : पालकमंत्री शंभूराज देसाई

चिमुकल्या विद्यार्थींनीच्या हस्ते शाळा इमारतीचे उद्घाटन

तांबवे – गुणवंत व संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याचे काम ज्या मंदीरात होते, ती म्हणजे शाळा होय. खाजगी शाळेला पेक्षा सुंदर इमारत लोकसहभागातून उभी राहिली आहे. हे गावकऱ्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार  पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. वस्ती साकुर्डी (ता. कराड) येथे पी एम श्री योजना व लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळा इमारत उद्घाटन करताना ते बोलत होते.

यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, गट शिक्षणाधिकारी बिपिन मोरे, कोयना बँक संचालक श्रीकांत बादल, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, पंचायत समिती सदस्य दिनेश कुंभार, माजी सरपंच विश्वास कणसे सरपंच काशिनाथ जाधव, उपसरपंच सुभाष निकम , बाजार समिती उपसभापती प्रकाश पाटील, माजी सरपंच नारायण सुर्वे,अशोकराव पतसंस्था चेअरमन शरद चव्हाण, मुख्याध्यापक आबासो शिरतोडे, पांडुरंग पाटील, शिवाजी निकम, संभाजी बाबर, श्रीकांत ढगाले, काशिनाथ मोरे, ग्रामसेविका वर्षा पवार, अविनाश पाटील, विक्रम पाटील, सचिन पवार यांची उपस्थिती होती.

https://www.instagram.com/reel/DXT2IszGky9/?igsh=MTRlaXJjcDAwOHp0cQ==

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी अंगी जिद्द, चिकाटी असते.त्यांना योग्य मार्गदर्शन केले की ते जीवनात यशस्वी होतात.

माजी सरपंच विश्वास कणसे म्हणाले, शाळा हे ज्ञान दानाचे मंदिर आहे. येथे भविष्यातील संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम केले जाते. या शाळेत संगणकीय लॅब, विज्ञान प्रयोग शाळा, क्रिडांगण अशा अनेक भौतिकसुविधा युक्त अशी शाळा आहे. गुणवत्ता वाढीसाठी सहशालेय उपक्रम राबविले जातात. या कार्यक्रमाचे स्वागत विश्वास कणसे व आभार आबा शिरतोडे यांनी मानले.

पालकमंत्र्यांच्या कृतीने लक्ष वेधले

वस्ती साकुर्डी येथे दिमाखदार अशी शाळेची इमारत उभी राहिली आहे. या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई आले, तेव्हा चिमुकल्या दोन विद्यार्थिनी फीत कापण्याचे साहित्य घेऊन उभ्या होत्या. यावेळी पालकमंत्र्यांनी याच दोन विद्यार्थिनींच्याकडून शाळेच्या इमारतीच्या उद्घाटनाची फीत कापून त्या विद्यार्थ्यांना मान दिला. त्यांच्या या कृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close