जागर : डाॅ. नरेंद्र दाभोलकर आणि नरेंद्राचार्य महाराज यांच्यातील सामना कोण जिंकल?

विशाल पाटील (हॅलो न्यूज…जागर)
आज 21 व्या शतकातही श्रध्देचा आणि अंधश्रध्देचा वाद पहायला मिळत आहे. अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डाॅ. नरेंद्र दाभोलकर आणि नाणीज मठाचे मठाधिपती जगद्गुरू अशी पदवी असलेले नरेंद्राचार्य महाराज यांच्यात एक जुंगलबंदी झाली होती. या जुंगलबंदीत कोण जिंकल कोण हारले यापेक्षा श्रध्दा आणि अंधश्रध्दा कोण पसरवत, याबाबत मोठे उदाहरण आहे. प्रत्येकाने या दोन्ही व्यक्तीच्या सवाल जवाब श्रध्दा आणि अंधश्रध्देतील फरक सांगत आहे. काय घडल होत या ठिकाणी याचाच जागर…
तारीख होती 25 सप्टेंबर 1998 हा सामना झाला. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात एक कुतुहल आणि उत्सुकता असल्याचे चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. एका व्यक्तीच्या आजूबाजूला त्यांच्या अनुयायांचा जमाव बसलेला होता आणि मग उभी असलेली व्यक्ती एका मागून एक प्रश्न विचारायला लागली. समोरची व्यक्ती न घाबरता त्याची उत्तर द्यायला लागली. यामधील एक व्यक्ती होती जगद्गुरु नरेंद्र महाराज आणि दुसरे होते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर. हा सामना होता समाजातील दोन विचारसरणींचा. एका बाजूला श्रद्धा भक्तीच प्रतीक आणि दुसऱ्या बाजूला विज्ञान विवेक आणि तर्कशक्तीचा पुरस्कर्ता हा सामना बघायला अनेक लोक जमले होते पण प्रश्न असा की 27 वर्षांपूर्वी झालेल्या या ऐतिहासिक युक्तिवादात खरंतर कोण जिंकलं आणि कोण हरलं आणि शेवटी निष्कर्ष काय निघाला होता.
प्रश्न क्र.1 – डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी नरेंद्र लीलामृत या पुस्तकात नरेंद्र महाराजांच्या पत्नी सुप्रिया सुर्वे यांनी प्रदर्शित केले आहे. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत असं म्हटलय की, नरेंद्र महाराज हे गजानन महाराजांचे अवतार आहेत, असा उल्लेख आहे. यासाठी नरेंद्र महाराज हे स्वतःला गजानन महाराजांचे अवतार मानतात का? हे सांगावं आणि शेगावच्या श्री गजानन संस्थानाने श्री गजानन महाराजांचा अवतार मानणारी व्यक्ती भोंदू आहे असं जाहीर केल. यावर नरेंद्र महाराजांनी आपलं मत द्यावं.या प्रश्नाला नरेंद्र महाराज उत्तर देतात की प्रश्न क्रमांक एक याच उत्तर असे की प्रकाशित केलेल्या पुस्तकात ट्रस्टचे अधिकृत मत नाही. शिवाय आम्ही स्वतःला गजानन महाराजांचे अवतार कधी समजतच नाही. तर गजानन महाराज संस्थानाने केलेला खुलासा त्यांचा वैयक्तिक खुलासा आहे. त्यावर माझं काहीच मत नाही.
प्रश्न क्र. 2- डाॅ. दाभोळकरांचा दुसरा प्रश्न – नरेंद्र महाराज लीलामृत या पुस्तकात 19 व्या अध्याय पान क्रमांक 200 मध्ये प्रथम आवृत्ती श्री राजाभाऊ लिमये यांच्या वहिनी माधवी मोहन लिमये यांना फटका मारला. त्यानंतर लगेचच त्यांच्या त्वचेवर पडलेले पांढरे डाग बरे झाले असा उल्लेख आहे. माधवी लिमये यांनी हा मजकूर पूर्ण खोटा असल्याचं भाषणात आणि लेखी निवेदनात जाहीर केले होते. तेव्हा नरेंद्र महाराजांनी खोटा दावा का केला आणि एखाद्या व्यक्तीला असं फटका मारणं योग्य आहे का? त्यावर महाराज उत्तर देतात, की मी चमत्कार करतो असा दावा कधीच केलेला नाही. मी लिमये वहिणींना कधी फटकाही मारलेला नाही. लीलामृत हे लोकांना आलेल्या अनुभूतीचे कथानक आहे. त्या
प्रश्न क्र. 3- डाॅ. दाभोळकर पुढे प्रश्न करतात की लीलामृतात पांडुरंग पेंढारी यांची वहिनी आणि सुभाष कदम यांचे नातेबाईक मृत झाल्यानंतर महाराजांनी त्यांना पुन्हा जिवंत केल्याचा उल्लेख आहे. त्याबद्दल लीलामृतात म्हटलंय की डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत जाहीर केलं होतं. मात्र महाराजांनी पुन्हा त्यांना जिवंत केलं. आता याबाबतचा कोणताही पुरावा समितीने वारंवार मागूनही त्यांना देण्यात आलेला नाही. जर या बैठकीत महाराजांनी पुरावा दिला नाही. तर त्यांचा हा दावा खोटा ठरवण्यात येईल. यावर नरेंद्र महाराज यांचं काय म्हणणं आहे. दाभोळकरांच्या प्रश्नावर महाराज म्हणाले, की हा दावा आम्ही केलेला नसून त्याबद्दल पुरावा देण्याचा प्रश्नच येत नाही.
प्रश्न क्र.4- डाॅ. नरेंद्र दाभोळकर प्रश्न करतात की काही भक्तांच्या डोक्यावरचे गेलेले केस सुद्धा महाराजांनी परत आणलेत हे सुद्धा लीलामृतात म्हटलंय. आता याबाबत आम्ही नरेंद्र महाराजांना टक्कल पडलेली माणसं देऊ इच्छितो आणि त्यांना त्यांच्या डोक्यावर केस आणून दाखवावे. जर केस आले तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराजांच शिष्यस्तव पत्करेल पण जर तसं झालं नाही. तर महाराजांनी लोकांची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागावी. यानंतर नरेंद्र महाराज थोडं हसत म्हणाले, हे वारंवार त्याच प्रकारचे प्रश्न विचारले जातात मी कधीच चमत्कार केल्याचा दावा केलेला नाही. हे दावे माझे नसून भक्तांचे आहेत, म्हणून मी कुठलीही माफी मागणार नाही.



