क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

कराड शहरातील मुख्य बाजारपेठेत शॉर्टसर्किटने दुकानाला आग

आगीत एक जण जखमी, फटाकेही जळाले

कराड : शहरातील मध्यवर्ती असलेल्या दत्त चौक परिसरातील एका दुकानाला आज रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली. दुकानात आग लागल्यानंतर त्यातून फटाक्यांचाही मोठा आवाज आल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. दरम्यान यामध्ये एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे दत्त चौक परिसरात पोलिसांनी सांगितले. अजिंक्य धुमाळ असे जखमीचे नांव आहे.

आगीची माहिती मिळताच कराड नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे कर्मचाऱ्यांनी अग्निशमन बंब घेऊन घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग भिजवण्याचा प्रयत्न केला. सुमारे पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान नागरी वस्तीत लागलेल्या या आगीमुळे विद्युत पुरवठा ही काहीकाळ खंडीत करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच शहरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. कराड शहर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी त्या परिसरातील परिस्थिती पूर्वपदावर आणली. सदरील आग कराड शहरातील दत्त चौकात असलेल्या मांढरदेवी कॉम्प्लेक्स मधील दुकानाला लागलेली होती.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close