Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगराज्यसांगलीसातारा

इंदोली फाट्यावर कालगावच्या सरपंचाकडून गोळीबार : दोन्ही पायात गोळ्या लागल्या

श्रीकांत जाधव :- उंब्रज प्रतिनिधी
पुणे- बेंगलोर महामार्गावर इंदोली फाटा जवळ पेरले गावात जाणाऱ्या रस्त्यावर मध्यरात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सदरील गोळीबार कराड तालुक्यातील कालगावचे सरपंच सोमनाथ चव्हाण याने केला असल्याची फिर्याद  हल्ल्यातील जखमी संतोष घोलप (वय 37 वर्षे, मुळ रा. कालगाव ता. कराड जि. सातारा सध्या रा. उंब्रज हॉस्पीटलच्या पाठीमागे) याने दिली आहे. फिर्यादीत सोमनाथ रमेश चव्हाण (रा. कालगाव ता. कराड) आणि योगेश सुदाम दिक्षीत (रा. मसुर ता. कराड) यांच्यावर उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.17/7/2026 रोजी रात्री 11.45 वा. च्या सु. पेरले गावच्या हद्दीत इंदोली ब्रीज जवळील पाणंद रस्त्यावर सोमनाथ चव्हाण संतोष घोलप याला फोन करून पैशाचा व्यवहार मिटवु याकरिता बोलावुन घेतले होते. यावेळी सोमनाथ व त्याच्यासोबतचा योगेश दिक्षीत याने शिवीगाळ करून धमकावुन सोमनाथ याने त्याचे फॉच्युनर कारमधुन पिस्तुल काढुन संतोषला जीवे ठार मारण्याच्या हेतुन माझ्यावर दोन राऊंन्ड फायर केले असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. सदरील बंदुकीच्या गोळ्या चुकविताना संतोषच्या उजव्या व डाव्या पायाला गोळ्या लागुन तो गंभीर जखमी झाला आहे. फिर्यादाने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला असल्याने तक्रार दिली आहे. जखमीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिक तपास सपोनि पंकज पवार करत आहेत.

या घटनेमुळे कराड तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांची दोन पथके तपासासाठी रवाना झाल्याची माहिती प्रभारी पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर यांनी दिली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close