क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यशैक्षणिकसातारा

साताऱ्यात विद्यार्थ्याला शिक्षा केल्याने शिक्षकाला पालकाची बेदम मारहाण

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
शहरातील सोमवार पेठेतील एका शाळेत गेले चार दिवसापासून विद्यार्थ्यांला समज दिली जात होती. तसेच याच विद्यार्थ्यांला एका शिक्षकांनी शिक्षा दिली, या कारणावरून विद्यार्थ्याच्या पालकाने शिक्षकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडल्याने गोंधळ उडाला. संबंधित शिक्षकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुलाला मारहाण केल्याचा राग मनात धरून सकाळी शाळा भरताना संबंधित मुलाचे पालकांनी गोंधळ करत शाळेत शिरले. शाळेतील पर्यवेक्षक कक्षासमोर आरडाओरडा करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. संबधित पालक गोंधळ घालत होते, तेथेच शिक्षक होते. विद्यार्थ्याच्या पालकाने संबंधित शिक्षकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ही गोष्ट समोर आल्यावर शाळेतील अन्य शिक्षक व उपस्थित पालकांनी शिक्षकाला त्यांच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर संबंधित शिक्षकाला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. मार लागला असल्यामुळे पोलिसांनी संबंधित शिक्षकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. तेथे त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले.

दरम्यान, या प्रकाराची माहिती समजल्यानंतर शाळेत पालकसंघाची बैठक झाली. त्यामध्ये या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात आला. कोणत्याही शिक्षकाला अशाप्रकारे मारहाण होता कामा नये, काही तक्रारी असल्यास त्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करता येऊ शकते. त्यामुळे हा प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close