Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

इंग्रजी शाळेतील प्रकार : मुलीला ‘BOSS’ म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना जाब विचारणाऱ्या पालकावर हल्ला

कराड तालुक्यातील प्रकार

कराड :- शाळकरी मुलांकडील एका किरकोळ चिडवाचिडवीच्या प्रकाराने मलकापूर परिसरात हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीला वारंवार ‘BOSS’ म्हणत चिडवणाऱ्या विद्यार्थ्यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकावर दगड, बेल्ट तसेच लाथाबुक्क्यांनी हल्ला करण्यात आला. या प्रकरणी कराड शहर पोलिसांनी एका प्रौढासह दोन अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अल्पवयीन असल्याने त्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुलगी मलकापूर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत आहे. तिच्या वडिलांच्या दुचाकीवरील ‘BOSS’ या स्टिकरवरून काही विद्यार्थी तिला वारंवार चिडवत होते. याबाबत मुलीने घरी सांगितल्यानंतर संबंधित पालक विद्यार्थ्यांना समज देण्यासाठी गेले असता वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले.

एका प्रौढाने दगडाने डोक्यावर वार केल्याचा, तर दोन अल्पवयीनांनी बेल्ट, हात व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. जखमी पालकांनी उपचार घेतल्यानंतर कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close