क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

जखिनवाडीत दहशत माजविणाऱ्या तडीपार गुंडास अटक : कराड डीबीची कारवाई

कराड | कराड शहर पोलिसांच्या हद्दीतून दोन वर्षासाठी हद्दपार केलेल्या एका तडीपार गुंडास जखिनवाडी (ता. कराड) येथून अटक करण्यात आली आहे. तडीपार असताना उल्लघंन करून दहशत माजविणाऱ्या देवा अशोक बेडगे याला कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती कराड शहर पोलिसांनी दिली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार देवा अशोक बेडगे व त्याचे इतर साथिदार यांना कराड शहर पोलीसांनी 02 वर्षांसाठी हद्दपार केले आहेत. या आदेशाचे उल्लघंन करून देवा बेडगे हा कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील जखिनवाडी गावात येवुन दहशत माजवत असल्याची बातमी कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस उप निरिक्षक आर. एल. डांगे यांना मिळाली होती. पोलीस उप निरिक्षक आर. एल. डांगे हे डी. बी. पथकासह घटनास्थळी पोहचले. तेव्हा पोलिसांना पाहून संशयित देवा बेडगे हा पळाला, यावेळी त्याचा पाठलाग करुन त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बागंर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक आर. एल. डांगे, सफाै रघुवीर देसाई, सफाै. देवकुळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, शशि काळे, पो. शि. महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, संतोष लोहार, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close