Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

यात्रेत ऑर्केस्ट्रासमोर नाचताना दोन गटात तुंबळ मारामारी

कराड | गावच्या यात्रेत ऑर्केस्ट्रासमोर नाचताना झालेल्या वादावादीच्या कारणावरून दोन गटात तुंबळ मारामारी झाली. या मारामारीत आठ ते दहाजण जखमी झाले. कराड तालुक्यातील गोळेश्वर येथे ही घटना घडली.

याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. त्यावरून दोन्ही गटातील 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुरेश वसंत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, प्रकाश जाधव, संतोष पाटील, योगेश जाधव, अमोल जाधव, निवास जाधव, प्रज्वल जाधव, सुरज जाधव, मोहन जाधव, अक्षय जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ऑर्केस्ट्रामध्ये झालेल्या वादावादीच्या कारणावरून आरोपींनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे सुरेश जाधव यांच्या फिर्यादीत म्हटले आहे.

तर याउलट प्रकाश निवास जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून बाबासो जाधव, संजय जाधव, शिवराज जाधव, रोहित जाधव, प्रतीक जाधव, सुरेश जाधव, दीपक जाधव, अजय जाधव, विजय जाधव, विशाल जाधव, मंगल जाधव, सुजाता जाधव यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आलाय. आरोपींनी हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याचे प्रकाश जाधव यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार सुनील पन्हाळे तपास करतायत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close