Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनब्रेकिंगराजकियराज्यसातारा

कराड जनता बॅंक कर्ज प्रकरण : राजेश पाटील- वाठारकरांसह 27 जणांच्या चाैकशीचे न्यायालयाचे आदेश

कराड । दिवाळखोरीत निघालेल्या कराड जनता सहकारी बँकेच्या 296 कर्मचाऱ्यांच्या नावावर काढलेल्या 4 कोटी 62 लाख 87 हजारांच्या कर्ज प्रकरणात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील- वाठारकर याच्यांसह 27 जणांसह बँकेचे अवसायानिकांच्या चौकशी करण्याचे आदेश कराड येथील फौजदारी न्यायाधीश एम. व्ही. भागवत यांनी दिले आहेत, अशी माहिती फिर्यादी राजेंद्र देसाई यांनी दिली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागितलेली परवानगी नाकारत उलट गंभीर प्रकार आढळून येत आल्याने त्याचाही गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्या. भागवत यांनी दिले आहेत.

कराड जनता सहकारी बँक विविध कारणाने आर्थिक अडचणीत आली. त्यामुळे बँकेची दिवाळखोरी जाहीर झाली आहे. त्याच आर्थिक अडचणी दरम्यान 296 कर्मचाऱ्यांच्या नावावर बँकेने चार कोटी 87 लाखांची कर्ज प्रकरणे केली होती. त्यावरही त्या काळात कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. त्याच्या वसुलीवरही कर्मचाऱ्यांचा आक्षेप होता. बँकेने कर्मचाऱ्यांना वाटलेली कर्जे संशयास्पद आहेत, त्याची चौकशी करा, अशी मागणी 296 कर्मचाऱ्यांनी केली होती. उपनिबंधकांसहीत अनेक सरकारी कार्यालयात त्यांनी अर्ज दिले होते. मात्र त्यांचा अर्ज कोठेच टिकला नाही. अवसायिकांनी त्यांची वसुली कायम ठेवली होती. अखेर कर्मचाऱ्यांनी त्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. कर्मचाऱ्यांना वाटलेली कर्जे बोगस आहेत. त्यांची परवानगी न घेताच ती दिली आहे, असा दावा न्यायालयात दाखल केला होता. त्यानुसार त्याच्या पोलिस चौकशीचे आदेश दिले होते. त्यात प्रकरणात शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी त्याचा तपास केला. त्यात कर्मचाऱ्यांनी केलेले आरोप फेटाळले होते. याउलट त्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची द्यावी, असा अहवाल न्यायालयात दिला होता.

पोलिसांनी दाखल केलेल्या अहवालावर आक्षेप घेत कर्मचाऱ्यांनी पुन्हा अपील दाखल केले. त्यात कर्मचाऱ्यांतर्फे अॅड. पी. आर. लोमटे, अॅड. अमोल खोंडे यांनी काम पाहिले. न्यायालयात कर्मचाऱ्यांच्या कर्ज प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेला अहवाल चुकीचा आहे, असा युक्तीवाद वकीलांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य मानत 296 कर्मचाऱ्यांच्या कर्ज प्रकरणात झालेल्या गंभीर प्रकाराची दखल घेतली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागितलेली परवानगीही न्यायालयाने फेटाळली आहे. त्याउलट गंभीर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. विश्वासघात, फसवणूक, आर्थिक फसवणूक, बनावट दस्ताऐवज तयार करणे, त्याचा वापर करणे, त्या आधारे एखाद्याची पसवणूक करण्यासारखे गंभीर प्रकार झाल्याचे न्यायालयाने प्रथमदर्शनी मान्य त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, 21 संचालकांसहीत अवसायानिक, तीन अधिकारी व तीन कर्जदार 27 जणांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

चाैकशीतील 27 नावे पुढीलप्रमाणे
कराड जनता बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील वाठारकर, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास सुर्यवंशी, संचालक विकास धुमाळ, राजीव शहा, सुरेश लाहोटी, दिलीप चव्हाण, आकाराम शिंगण, दिनकर पाटील, शंकरराव काटे, प्रकाश तवटे, शिवाजी पाटील, वसंतराव शिंदे, रमेश गायकवाड, डॉ परेश पाटील, संजय घोक्षे, राजेंद्र पाटोळे, प्रतिभा पाटील, ज्योती शहा, अनिल यादव, संजय जाधव, विजयकुमार डुबल, दीपक पाटणकर, बाजीराव पाटील, अरुण पाटील आणि भाऊसाहेब थोरात या 27 जणांची चाैकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close