कृषीकोल्हापूरखेळताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

Video : ट्रॅक्टर- ट्राॅली रिव्हर्स स्पर्धेत कराड, कोल्हापूरची बाजी

कराड | पश्चिम सुपने (ता.कराड) येथे श्री. जोतिर्लिंग यात्रेनिमित्त ट्रॅक्टर- ट्राॅली रिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला असून उलटे धावणारे ट्रॅक्टर- ट्राॅलीचा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. या स्पर्धेत अकुंश गायकवाड (पश्चिम सुपने) यांच्या टॅक्टर- ट्राॅलीने पहिल्या क्रमाकांचे 10 हजार 1 रूपये आणि सन्मानचिन्ह देवून गाैरविण्यात आले.

या स्पर्धेत दुसरा क्रमांक (7 हजार 7 रूपये) लक्ष्मण देवळे (कागल, जि. कोल्हापूर), तिसरा क्रमांक (5 हजार 5 रूपये) युवराज कदम- बाबर (बाबरमाची, ता. कराड), चतुर्थ क्रमांक (3 हजार 3 रूपये) संदिप निंबाळकर (कागल, जि. कोल्हापूर), पाचवा क्रमांक (1 हजार 555) सिध्दार्थ पाटील (आणे, ता. कराड) यांनी रोख रक्कम व सन्मानचिन्ह पटकाविले.

विजेत्यांना रयत कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव गायकवाड, चेअरमन हंबीरराव गायकवाड, रामचंद्र चव्हाण, प्रदिप गायकवाड, सदस्य ग्रामपंचायत हिम्मतराव थोरात, दिपक गायकवाड, प्रवीण थोरात, भिकाजी गायकवाड, उमेश गायकवाड आदीच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close