आ. मनोजदादा घोरपडे वाढदिवस – ओगलेवाडीत सामाजिक उपक्रमांनी शुभेच्छा
हिंदकेसरी संतोष वेताळांनी स्वतः केले रक्तदान


कराड ः- कराड उत्तरचे विद्यमान आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमीत्त ओगलेवाडी गणपती मंदीर येथे भव्य रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी आयोजित करण्यात आले होते. तसेच किल्ले सदाशिवगडच्या पायथ्याशी वृक्षारोपण करण्यात आले. रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी मोठा प्रतिसाद दिला. या शिबिरात पैलवान संतोष वेताळ यांनी रक्तदान करून आमदार मनोज घोरपडे यांना शुभेच्छा दिल्या. तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास पंचायत समिती उपसभापती सौ. अनिताताई सतीश वेताळ, सौ. माधवी पाटसुपे (पंचायत समिती सदस्य सैदापूर गण), श्री.राहूल पाटील (जिल्हा उपाध्यक्ष भाजपा), श्री. अमोल पवार ( संचालक माण-खटाव कारखाना), कामगार नेते श्री. नवनाथ पाटील, श्री. कृष्णत मदने (माजी उपसरपंच सुर्ली), पै. सुधीर डांगे, श्री. प्रकाश पवार (सदस्य खरेदी- विक्री संघ कराड), डॉ. विजय खंडागळे, श्रीनिवास डुबल, श्री. सतीश वेताळ (फौजी), श्री. जयवंत खरात (विरवडे वि.सोसायटी सेवा चेअरमन), श्री. सुभाषराव कदम (बाबरमाची), सौ. अनुराधा माने (सरपंच सुर्ली), श्री. तुकाराम नलवडे (मंडल अध्यक्ष कोपर्डे गण भाजपा), श्री. धनाजीराव माने (माजी सरपंच), श्री. दिगंबर डांगे, श्री.सतीश डांगे आदी उपस्थित होते.
हिंदकेसरी संतोष वेताळ म्हणाले, महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनामुळे आपण सामाजिक उपक्रमांने आमदार मनोजदादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत. गेल्या 14 वर्षात 21 हजार लोकांना नेत्र तपासणीच्या माध्यमातून आ. मनोजदादा घोरपडे मित्र परिवारांच्या माध्यमातून दृष्टी देणाच काम करण्यात आले. यापुढील काळातही सामाजिक कार्यासोबत कुस्ती क्षेत्रात आम्ही योगदान देत राहू आणि पुढील वर्षी भव्य अशा कुस्ती स्पर्धा घेवू.



