कालेत चौथीतील चिमुकल्यांनी जपली मैत्रीची खरी ओळख : भावनिक क्षणाने शिक्षकांसह पालक झालेले नि:शब्द
खाऊच्या पैशातून मित्राला दिली सायकल भेट

कराड :- माणुसकी मैत्री आणि सहवेदना शिकवण्यासाठी मोठ्या व्याख्यानाची गरज असते ही आणि कधी कधी ती कृतीतून सुद्धा दिसते जेव्हा चौथीत शिकणारी निष्पाप मुले ही आयुष्याचा मोठा धडा देऊन जातात तेव्हा शब्दही निशब्द होतात. काले येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या केंद्रशाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून वर्ग मित्रासाठी सायकल खरेदी करून दिली आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या संत तुकाराम महाराजांच्या वचनाला प्रत्यक्ष कृतीतून जिवंत केले.
शाळेत नेहमी हसतमुख अभ्यासात हुशार आणि सर्वांचा लाडका असलेला शिवस्व त्रिशूल देसाई याच्या आयुष्यावर दोन महिन्यापूर्वी दुःखाचा डोंगर कोसळला. आजारपणामुळे त्याच्या वडिलांचे अकाली निधन झाले आणि कुटुंबाचा आधारच हरपला घरातील आर्थिक परिस्थिती बेताची झाली. वयाची ऐंशी ओलांडलेले आजोबा आणि घराची सर्व जबाबदारी खांद्यावर आलेली, आई यांच्यासमोर शिवस्वला दररोज शाळेत आणणे नेणे, ही अडचण बनली शिवस्वची अडचण शिवस्वच्या मित्रांच्या नजरेतून सुटली नाही. आपल्या मित्राचे शिक्षण केवळ प्रवासाचे अडचणीमुळे थांबू नये. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी चौथीतील चिमुकल्यांनी एक वेगळाच निर्णय घेतला.
रोजच्या खाऊ साठी मिळणाऱ्या पैशातून त्यांनी थोडी थोडी बचत केली आणि त्या पैशातून शिवस्वसाठी नवीन सायकल घेण्याचा निर्धार केला. विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या निधीतून शिवस्वला सायकल भेट देण्यात आली. सायकल हातात मिळाल्यानंतर शिवस्वच्या चेहऱ्यावर उमटलेला. आनंद आणि त्याच्या आईच्या डोळ्यात दाटून आलेले पसरू उपस्थिती त्यांना भावो करून गेले. ही भेट केवळ सायकल नव्हती. तर एका मित्राच्या शिक्षणाला मिळालेला आधार संकटात साथ देणाऱ्या मैत्रीचा जिवंत पुरावा आणि माणुसकीचा अमूल्य संदेश होता. या घटनेतून विद्यार्थ्यांनी वयाने लहान असले तरी विचारांनी किती मोठे असू शकतात, याची प्रचिती आली. संवेदनशीलतेची भावना जपणाऱ्या या चिमुकल्यांनी समाजासमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.
चिमुकल्यांनी शिकवला माणुसकीचा धडा
वडिलांच्या निधनानंतर श्वस्वचा आयुष्यात आलेले संकट मित्रांनी स्वतःचे मानले. खाऊच्या पैशातून जमा झालेला, प्रत्येक रुपया मैत्रीचे नाते अधिक घट्ट करत गेला. सायकलीची भेट ही केवळ वस्तू नव्हती. तर शिक्षणाचा नवा प्रवास होता. मित्रांच्या या कृतीने आईच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. या सायकलची प्रत्येक फेरी शिवस्वला मित्रांच्या प्रेमाची आठवण करून देत राहील. चौथीतील चिमुकल्यांनी मोठ्यांनाही माणुसकीचा धडा शिकवला.



