ईतरताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

“नाईकबा च्या नावानं चांगभलं “च्या गजरात गुलाल खोब-याच्या उधळण

पाटण | महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री नाईकबा देवाची यात्रा “नाईकबा च्या नावानं चांगभलं “च्या गजरात आणि गुलाल खोब-याच्या उधळणीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. पाटण तालुक्यातील नाईकबा पठारावर 40 ते 50  सासनकाठ्यां राज्यासह परराज्यातून येतात.

श्री नाईकबा देवाची यात्रेनिमित्त नाईकबा डोंगरावर भक्तजनांचा जनसागर उसळला होता. भाविकांच्या मध्ये मोठे उत्साहाचे वातावरण होते. यात्रेच्या आदल्या दिवशी सायंकाळी हजारोंच्या संख्येने स्वतः च्या, मिळेल त्या वाहनाने भक्त नाईकबाच्या डोंगर माथ्यावर दाखल झाले होते. चैत्र शुद्ध पंचमी रविवार दि. 26 मार्च हा देवाचा नैवद्याचा दिवस तर चैत्र शुद्ध षष्ठी सोमवार दि. 27 मार्च हा यात्रेचा मुख्य दिवशी देवाचा पालखी सोहळा संपन्न झाला. बनपुरी व जानुगडेवाडी गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री क्षेत्र नाईकबा देवाच्या यात्रेत कराड येथील रैनाक व शिंदे यांची मानाची सासनकाठी गुढीपाडव्या पुर्वीच दाखल झाली होती.

आज यात्रेच्या मुख्य दिवशी नाईकबाचा डोंगर गुलाबी रंगाने उधळून गेला होता. सासनकाठ्या वाद्यांच्या गजरात नाचवले जात होत्या. या सोहळ्यानंतर देवाच्या दर्शनासाठी प्रचंड मोठी रांग लागली होती. मिठाईची दुकाने, हॉटेल, स्टेशनरी, खेळण्याची दुकाने अशा अनेक दुकानाकडे यात्रेकरूंनी प्रचंड गर्दी होती. यात्रा काळात नाईकबा भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून तालुका प्रशासन, ग्रामपंचायत बनपुरी, श्री नाईकबा देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी व प्रमुख नागरिक आणि पोलीस विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, वीजवितरण, बांधकाम अशा सर्व विभागानी चोख व्यवस्था ठेवली होती. ढेबेवाडी पोलिस स्टेशनचे सपोनि अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker