स्व. अजितदादा पवार जयंती व ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कराड तालुका व रयत संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच जि.प. सदस्य व रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील (उंडाळकर) यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दि. २१ व २२ जुलै २०२६ रोजी कोयना सहकारी बँक लि., मुख्य कार्यालय, लोकनेते स्व. विलासकाका पाटील (उंडाळकर) प्रवेशद्वार, मार्केट यार्ड, कराड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन व भेटीप्रसंगी राजेंद्रसिंह यादव (नगराध्यक्ष कराड), विजय यादव (नगरसेवक कराड), प्रदीप पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य), नामदेव पाटील (सातारा जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस), मनोहर शिंदे (उपनगराध्यक्ष मलकापूर), अप्पासो गरुड (माजी सभापती), धोंडीराम जाधव (संचालक, कृष्णा सहकारी साखर कारखाना), प्रा. धनाजी काटकर, प्रदीप पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य), पै. आनंदराव मोहिते, अजित थोरात (माजी नगरसेवक), मृणालिनी इंगवले (नगरसेविका), राजेश पाटील (वाठारकर), सुनील पाटील (विजयनगर), पै. सतीश इंगवले (सभापती), संग्रामसिंह देशमुख, बाबुराव धोकटे (अध्यक्ष, कोयना दूध संघ), के. टी. पाटील (अध्यक्ष, कोयना सहकारी बँक), साहेबराव शेवाळे (उपाध्यक्ष, कोयना सहकारी बँक), अनिल मोहिते (अध्यक्ष, कराड खरेदी-विक्री संघ), जगन्नाथ मोरे (उपाध्यक्ष, कराड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ), शहाजी शेवाळे (अध्यक्ष, शामराव पाटील पतसंस्था), भागवतराव कणसे, पांडुरंग पाटील (तात्या), रोहित पाटील, जयसिंग चव्हाण, महेशकुमार जाधव, विजय मुठेकर, मोहनराव माने, नितीन ढापरे, शिवाजी जाधव (उपाध्यक्ष, कोयना दूध संघ), भीमाशंकर माउर (नगरसेवक मलकापूर), दादासो शिंगण (नगरसेवक मलकापूर), लालासो जगदाळे (जिल्हा परिषद सदस्य), प्रमोद पाटील, दिनेश कुंभार (सदस्य, पंचायत समिती) तसेच नरेंद्र लिंबे (नगरसेवक कराड ) इ. मान्यवर यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले.
शिबिराला युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, कोयना सहकारी बँकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली. “रक्तदान हेच श्रेष्ठदान” हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करत प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करून गरजू रुग्णांच्या जीवनरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. स्व. ना. अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा गौरव करण्यात आला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कराड तालुका, रयत संघटना, कोयना सहकारी बँक प्रशासन, अक्षय ब्लड बँकेचे वैद्यकीय पथक, स्वयंसेवक आणि रक्तदाते यांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.



