kota acadamy karad
ताज्या बातम्यादेशपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यसांगलीसातारा

कोंबडीचोर, कोंबडीचोर : कराडला सदाभाऊ खोतांचा काॅंग्रेसकडून खरपूस समाचार

कडकनाथ कोंबडीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

कराड – दिल्लीतील जंतर मंतर वरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दहशतवाद्यांची उपमा दिल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. कराडला काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका करताना कोंबडीचोर असा उल्लेख केला आहे. यामुळे कडकनाथ कोंबडीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज्यात कडकनाथ कोंबडीमुळे अनेकजण अडचणीत आले होते, तसेच सदाभाऊ खोत व त्याच्या मुलाला या कडकनाथ कोंबडीमुळे आरोपांना सामोरे जावे लागले होते. कराड येथे काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्यासाठी भरपावसात आंदोलन केले.

कराड येथील दत्त चाैकात भर पावसात काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी अटकाव करत आंदोलकांना बाजूला केले. आंदोलनकांनी भर पावसात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका समोरील रस्त्यावर काहीकाळ घोषणा देत आंदोलन केले. सद्या तुझी लायकी काय कोंबडीचोर,कोंबडीचोर तसेच खाली मुंडी वर पाय सद्या तुझी खून काय असे म्हणत काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी डिवचंल आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल पवार, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, रवी बडेकर, कराड उत्तर काँग्रेस अध्यक्ष बाबुराव पवार, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अमित जाधव, काॅंग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक अध्यक्ष झाकीर पठाण, एससी काँग्रेस सेल जिल्हाध्यक्ष संजय तडाखे, प्रवीण वेताळ, दिग्विजय सूर्यवंशी, देवदास माने, चैतन्य पाटील, समीर इनामदार, वसीम इनामदार, दिग्विजय जमाले, महेश पवार, तुषार लोंढे, शानूर देसाई, अजित पवार, अमित जाधव, रविराज पाटील, संग्राम काळभोर, मुकुंद पाटील, विक्रम पाटील, प्रतिक निकम, नितीन पाटील, मुबीन बागवान, उमर सय्यद, गणेश सूर्यवंशी, प्रदीप जाधव, सुरेश भोसले, युवराज कुंभार, अक्षय सुर्वे, अमोल जाधव, शाहरुख मुल्ला, सचिन पाटील यांच्यासह काँग्रेस, युवक काँग्रेस, अल्पसंख्यांक काँग्रेस सेल, एससी काँग्रेस सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close