क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसांगली

बापानेच केला मुलाचा खून : शरीराचे कटरने केले दोन तुकडे अन् फेकले तलावात

सांगली | मिरज (जि. सांगली) येथे व्यसनाधीन मुलाचा एका बापाने क्रूरपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बापाने स्वतः च्या मुलाचा खून करून कटरने मृतदेहाचे दोन तुकडे करून तलावात फेकल्याचा प्रकार देखील समोर आला आहे. या प्रकरणी बापाला मिरज शहर पोलिसांनी अटक केली आहे. रोहित राजेंद्र हंडीफोड असं खून झालेल्या मुलाचं नाव आहे. या घटनेनंतर संशयित आरोपी राजेंद्र यल्लप्पा हंडीफोड (वय- 50) हा स्वतःहून पोलिसांत हजर झाला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिरज शहरातील सुभाष नगर येथे बापानेच स्वतः च्या मुलाचा कुऱ्हाडीने खून करून कटरने दोन तुकडे केले. यानंतर एक तुकडा शहरातल्या गणेश तलाव येथे टाकला आणि एक तुकडा गणेश तलावाच्या शेजारी असणाऱ्या घरामध्ये ठेवला होता. या खुनाच्या घटनेनंतर राजेंद्र हंडीफोड स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला. तसेच बापाने मुलाच्या खुनाची कबुली दिली.

त्यानंतर मिरज पोलिसांनी गणेश तलावातून रोहित हंडीफोड याच्या शरीराचा एक तुकडा बाहेर काढला आहे. तर दुसरा तुकडा त्याच्या घरात आढळून आला आहे. या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये सदर घटनेची नोंद झाली असून खून करणाऱ्या पित्याला अटक करण्यात आली आहे. तर बापाने मुलाचा निर्घृण खुन केल्याने घटनेने मिरज शहर हादरून गेले आहे. रोहित हंडीफोडे याला दारू आणि जुगाराचे व्यसन असल्याने त्यासाठी त्याच्याकडून कुटुंबाला प्रचंड त्रास देण्यात येत होता. या त्रासाला कंटाळूनच राजेंद्र हंडीफोड यांनी हा खून केल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker