कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसाताराहवामान

कोयना धरणात पावसाचा जोर मंदावला, जिल्ह्यात पेरण्यांना वेग

पाटण | कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाचा जोर मंदावला आहे. पूर्व भागात पावसाने चांगली उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी रखडलेल्या खरिपाच्या पेरण्या पूर्ण करण्यासाठी आज दिवसभर शेतात काम सुरू होते.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वरने एक हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा पार केला. गेल्या 24 तासांत कोयनानगर येथे 10, नवजाला 31 आणि महाबळेश्वरला 14 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना जलाशयाची पाणीपातळी 2045.05 फूट झाली असून, एकूण पाणीसाठा 16.09 टीएमसी झाला आहे. जलाशयात प्रतिसेकंद तीन हजार 792 क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

Koyana Dam Rain

दरम्यान, आज पश्चिम भागात रिमझिम पावसाच्या सरी पडत होत्या. पूर्व भागात पावसाने पूर्ण उघडीप दिलेली पाहावयास मिळाली. गेली काही दिवस वारंवार पावसामुळे खरिपाच्या पेरणीत व्यत्यय येत होता. उघडीप मिळाली, की शेतकरी पेरणीसाठी जात होता. मात्र, पाऊस आला, की घातमोड होऊन पेरणीची कामे थांबवून घरी परतावे लागत होते. आज सकाळी दहा वाजेपर्यंत रिमझिम पावसाच्या सरी पडत होत्या. मात्र, दहा वाजल्यानंतर पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने दिवसभर शेतकरी पेरणीची कामे उरकण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close